राष्ट्रवादीच्या माजी आमदाराला कोरोनाची लागण

६ तारखेला अंगदुखी आणि थोडा ताप जाणवू लागला. एमजीएम रुग्णालयात रुटीन चेकअप करायला आलो, तेव्हा डॉक्टरांनी कोरोना चाचणी करुन घेण्याचा सल्ला दिला. त्यानूसार स्वॅब तपासणीसाठी दिला आणि अहवाल पॉझीटीव्ह आला. त्यामुळे डॉक्टरांनी लगेच भरती करून घेतले, आता नियमाप्रमाणे १४ दिवस क्वारंटाईन होऊन मगच सुटका होईल.
ex mla Bhausaheb-Patil-Chitgaonkar corona affected news
ex mla Bhausaheb-Patil-Chitgaonkar corona affected news

औरंगाबादः जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला असला तरी त्याचा संसर्ग अद्याप कुठल्याही राजकीय नेता, लोकप्रतिनीधीला झाला नव्हता. मराठवाड्यातील नांदेड, बीड, लातूर जिल्ह्यात अनेक पुढाऱ्यांना तसेच राज्याच्या मंत्रीमंडळातील अनेक मंत्र्यांना  कोरोनाची लागण झाल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. आता यामध्ये औरंगाबादचा देखील समावेश झाला असून वैजापूरचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगांवकर यांना देखील कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. औरंगाबाद येथील एमजीएम रुग्णालयात स्वॅब तपासणी केली अता त्यांचा अहवाल पॉझीटीव्ह आला होता.

मुंबई, पुणे, ठाणे, पिंपरी चिंचवड, नाशिक नंतर राज्यातील सर्वाधिक कोरोना बाधित रुग्णांची संख्या व दगावणाऱ्यांची संख्या ही औरंगाबाद जिल्ह्यात आहे. जिल्हा प्रशासन कोरोनाची साखळी तोडण्यासाठी युध्द पातळीवर प्रयत्न सुरू केले, ॲन्टीजन टेस्टच्या माध्यमातून संसर्ग झालेल्या रुग्णांचे विलगीकरण करून प्रादुर्भाव कमी करण्यात काही प्रमाणात यश देखील आले.

कोरोनाचे संकट आणि चार महिन्यांच्या लॉकडाऊन काळात सर्वच राजकीय पक्षांचे नेते, लोकप्रतिनिधी, खासदार, आमदार लोकांच्या मदतीला धावून गेले. काळजी घेऊनही काही लोकप्रतिनिधी मंत्री, आमदार यांना कोरोनाने ग्रासले. औरंगाबाद जिल्हा त्या बाबती सुदैवी ठरला असतांना राष्ट्रवादीचे माजी आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगांवकर यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे.

‘सरकारनामा‘शी बोलतांना चिकटगांवकर म्हणाले, मतदारसंघात कधी याच्या घरी तर कधी त्याच्या घरी जाणे होत होते. शिवाय कोरोनाच्या संकटात लोकांच्या अडीअडचणी जाणून घेऊन त्या सोडवण्यासाठी बोहर फिरावेच लागायचे. आवश्यक ती सगळी काळजी घेतली, पण ६ तारखेला अंगदुखी आणि थोडा ताप जाणवू लागला. एमजीएम रुग्णालयात रुटीन चेकअप करायला आलो, तेव्हा डॉक्टरांनी कोरोना चाचणी करुन घेण्याचा सल्ला दिला. त्यानूसार स्वॅब तपासणीसाठी दिला आणि अहवाल पॉझीटीव्ह आला. त्यामुळे डॉक्टरांनी लगेच भरती करून घेतले, आता नियमाप्रमाणे १४ दिवस क्वारंटाईन होऊन मगच सुटका होईल.

मला कुठल्याही प्रकारचा त्रास नाही, माझी प्रकृती चांगली आहे. परंतु माझ्या संपर्कात आलेल्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी देखील खबरदारीचा उपाय म्हणून आपली तपासणी करून घेणे योग्य ठरेल, असे आवानह मी त्यांना करतो. रुग्णालयातून सुटका झाल्यानंतर नेहमीप्रमाणे पण घरूनच लोकांच्या सेवेत हजर राहीन, असेही चिकटगांवर यांनी सांगितले.

महाविकास आघाडी सरकारमधील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे मंत्री जितेंद्र आव्हाड यांना सर्वप्रथम कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर अशोक चव्हाण, धनंजय मुंडे, आमदार अभिमन्यू पवार, अमर राजूरकर, मोहन हंबर्डे, बाबाजाणी दुर्राणी, खासदार फौजिया खान यांच्यासह अनेक आजी-माजी पदाधिकारी त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले होते. माजी मुख्यमंत्री व कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते डॉ.शिवाजीराव पाटील निलंगेकर यांनाही कोरोनाची लागण झाली होती, पण वयाच्या ९१ व्या वर्षी त्यांनी यावर मात केली होती. त्यानंतर दोन दिवसांनी किडनीच्या विकाराने त्यांचे निधन झाले.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com