शेतकऱ्यांनी कृषी मंत्र्यांचा ताफा अडवत केली मदतीची मागणी... - Farmers block agriculture minister's demand for help ... | Politics Marathi News - Sarkarnama

शेतकऱ्यांनी कृषी मंत्र्यांचा ताफा अडवत केली मदतीची मागणी...

संतोष जोशी
रविवार, 27 सप्टेंबर 2020

ओला दुष्काळ जाहीर करुन सरसकट पंचनामे करावे आणि पिक विमा मंजुर करावा या मागणीसाठी शेतकरी बालाजी पाटील ढोसणे यांच्या नेतृत्वाखाली हा ताफा अडविण्यात आला. ओला दुष्काळ जाहीर झालाच पाहीजे, पिक विमा मंजुर झालाच पाहीजे, हम अपना अधिकार मागते, नही किसीसे भिक मागते म्हणत शेतकरी चांगेलच आक्रमक झाले होते.

नांदेड ः मराठवाडा दौऱ्यावर असलेले कृषीमंत्री दादा भुसे यांना मुखेड येथे शेतकऱ्यांच्या संतापाचा सामना करावा लागला. ओला दुष्काळ जाहीर करा, नुकसानीचे पंचनामे करून पिक विमा आमच्या हक्काचा अशा घोषणा देत शेतकऱ्यांनी कृषी मंत्र्यांच्या गाड्यांचा ताफा अडवला. दादा भुसे यांनी देखील गाडीतून उतरून शेतकऱ्यांचे निवदेन स्वीकारत त्यांना तातडीने नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याचे आश्वासन दिले.

राज्यासह मराठवाड्यातील बहुतांश भागात अतिवृष्टी झाल्याने शेतातील पिके, फळबागांचे अतोनात नुकसान झाले आहे. अनेक भागात शेतात गुढघाभर पाणी साचले आहे, तर काही ठिकाणी शेतजमीन वाहून गेल्या. त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. राज्य सरकारकडून पंचनामे करायला देखील उशीर होत असल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर मराठवाडा दौऱ्यावर असलेले कृषीमंत्री दादा भुसे यांना शेतकऱ्यांच्या रोषाला समोर जावे लागले.

कृषीमंत्री भुसे हे कालपासून मराठवाडा दौऱ्यावर आहेत. शनिवारी औरंगाबाद, जालना, हिंगोली जिल्ह्यातील पिकांच्या नुकसानीची बांधावर जाऊन पाहणी आणि जिल्ह्याचा आढावा घेतल्यानंतर आज ते परभणी आणि नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. नांदेड जिल्ह्यातील मुखेड येथे कृषीमंत्र्यांचा ताफा आला तेव्हा शेतकऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी करत हा ताफा अडवला. तेव्हा दादा भुसे यांनी देखील गाडी थांबवत शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकून घेतले. 

ओला दुष्काळ जाहीर करुन सरसकट पंचनामे करावे आणि पिक विमा मंजुर करावा या मागणीसाठी शेतकरी बालाजी पाटील ढोसणे यांच्या नेतृत्वाखाली हा ताफा अडविण्यात आला. ओला दुष्काळ जाहीर झालाच पाहीजे, पिक विमा मंजुर झालाच पाहीजे, हम अपना अधिकार मागते, नही किसीसे भिक मागते म्हणत शेतकरी चांगेलच आक्रमक झाले होते. अचानक शेतकरी ताफ्याच्या समोर शेतकरी आल्याने पोलिसांची चांगलीच तारंबळ उडाली होती. यावेळी तातडीने पंचनाम्याचे आदेश देण्यात आल्याचे सांगत लकवरच शेतकऱ्यांना आर्थिक मदत केली जाईल, असे आश्वासन भुसे यांनी आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना दिले.

दरम्यान, काल औरंगाबादेत दादा भुसे यांनी राज्यभरातील नुकसानीचे पंचनामे करून त्याचा एकत्रित गोषवारा तयार करून तो कॅबिनेटच्या समोर ठेवण्यात येणार असल्याचे आढावा बैठकीत सांगितले होते. आलो दुष्काळ जाहीर करा या मागणीवर देखील जोपर्यंत नुकसानीचे पंचनामे होऊन किती नुकसान झाले हे स्पष्ट होत नाही, तोपर्यंत या संदर्भात निर्णय घेता येणार नाही असेही त्यांनी स्पष्ट केले होते. 

Edited By : Jagdish Pansare
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख