शेतकरी उद्वस्त झाला आहे, केंद्र व राज्य सरकारने त्याला वाचवावे.. - The farmer is devastated, the Central and State Governments should save him | Politics Marathi News - Sarkarnama

शेतकरी उद्वस्त झाला आहे, केंद्र व राज्य सरकारने त्याला वाचवावे..

हरी तुगावकर
सोमवार, 19 ऑक्टोबर 2020

शासनाने आता ओला दुष्काळ जाहिर केला पाहिजे, अशी मागणीही संभाजीराजे यांनी केली. केंद्र व राज्य़ सरकारने संयुक्तरीत्या मदत करण्याची गरज आहे. या संदर्भात आपण मुख्यमंत्र्यांना भेटणार आहोत.रयतेच्या भावना त्यांच्यापर्यंत पोहचवणार आहे. ऐकायचे की नाही त्यांनी ठरवावे,असेही छत्रपती संभाजी राजे म्हणाले.

लातूर ः मराठवाड्यातील शेतकरी अतिवृष्टीमुळे उद्धवस्त झाला आहे. त्याच्यावर मोठे संकट कोसळले आहे. या नैसर्गिक संकटात त्याला मदत करणे गरजेचे आहे. मराठवाड्यातील या शेतकऱ्यांना वाचवण्याची गरज असून या करीता केंद्र व राज्य शासनाने पुढे यावे, असे आवाहन खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी  केले.

मराठवाडयात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्याकरीता सोमवारी
संभाजीराजे लातूर जिल्ह्यात आले होते. त्यानंतर पत्रकारांशी बोलतांना त्यांनी रयतेचे दुःख ऐकून घेणे ही छत्रपतींची जबाबदारी असल्याने मी येथे आलो असल्याचे त्यांनी सांगितले.
शेतकऱ्यांसाठी राजकारणाच्या पलिकडे जावून काम करण्याची गरज असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले.

संभाजीराजे म्हणाले, सरकारने तातडीने शेतकऱ्यांना ५० हजार रुपयाची मदत करावी. रब्बीच्या पेरणीलाही पैसा नसल्याने शेतकऱ्यांवर कर्ज काढण्याची वेळ आली आहे. अडचणीत असलेल्या शेतकऱ्याच्या या कर्जाची जबाबदारी शासनाने घेतली पाहिजे.पिक विमा उतरवण्य़ासाठी कंपन्या शेतकऱ्यांच्या घरी जातात. पण आता संकटाच्या
काळात कंपन्या विमा देण्यास तयार नाहीत.

तांत्रिक कारणे पुढे करून टाळाटाळ सुरु आहे. सरकारने या विमा कंपन्यांना कडक शब्दात मदतीसाठी आदेश देण्याची गरज आहे. शासनाने आता ओला दुष्काळ जाहिर केला पाहिजे, अशी मागणीही संभाजीराजे यांनी केली. केंद्र व राज्य़ सरकारने संयुक्तरीत्या मदत करण्याची गरज आहे. या संदर्भात आपण मुख्यमंत्र्यांना भेटणार आहोत.रयतेच्या भावना त्यांच्यापर्यंत पोहचवणार आहे. ऐकायचे की नाही त्यांनी ठरवावे,असेही छत्रपती संभाजी राजे म्हणाले.

आरक्षणासाठी ताकद दाखवावी..

मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे, पण कोणावर अन्याय होता कामा नये अशी
आमची भूमिका आहे. गरज पडली तर घटनेत बदल नव्हे तर दुरुस्ती म्हत्वाची आहे. कायद्यात सुधारणा होवू शकते. न्यायालयात शासनाने जोमाने बाजू मांडण्याची गरज आहे. तर दुसरीकडे पंतप्रधानाना भेटून त्यांच्यासमोर मराठा समाजाच्या व्यथा सांगण्याची गरज आहे. या करीता राज्यातील सर्व पक्षीय खासदारांनी एकत्र येण्याची गरज आहे. त्या दृष्टीने प्रयत्न सुरु आहेत. सर्वांनी एकत्र येवून महाराष्ट्राची ताकद दाखवावी, असे आवाहनही संभाजीराजे छत्रपती यांनी यावेळी केले.

Edited By : Jagdish Pansare

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख