सरकार खाली खेचणार हे सांगितल्याशिवाय फडणवीसांचे सैन्य त्यांच्यासोबत थांबत नाही.... - Fadnavis's army does not stop with him unless he says the government will pull him down | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

उर्मिला मातोंडकर मातोश्रीवर दाखल

सरकार खाली खेचणार हे सांगितल्याशिवाय फडणवीसांचे सैन्य त्यांच्यासोबत थांबत नाही....

जगदीश पानसरे
गुरुवार, 12 नोव्हेंबर 2020

सतीश चव्हाण यांनी विधान परिषदेत सातत्याने पदवीधर, शिक्षकांचे प्रश्न मांडले. विनाअनुदानित शाळांमधील शिक्षकांच्या वेतनाचा प्रश्न असेल, वैद्यकीय प्रवेशाच्या ७०ः३० फाॅर्म्युल्यामुळे मराठवाड्यातील विद्यार्थ्यांवर होणारा अन्याय असेल, नॅशनल लाॅ युनिव्ह्रसिटीची प्रश्न असेल या सगळ्यांवर आवाज उठवला. कृष्णा खोरे, नाशिकच्या धरणातून पाणी सोडण्याचा विषय असेल यावर देखील चव्हाण यांनी सभागृहात आक्रमकपणे बाजू मांडली आहे.

औरंगाबाद ः महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार तीन महिन्यात खाली खेचणार हे सांगितल्याशिवाय फडणवीसांचे सैन्य त्यांच्या सोबत थांबत नाही. आता वर्ष निघून गेले तरी त्यांना हे सरकार काही खाली खेचता आले नाही, अशीच पुढची चार वर्ष निघून जातील, पण सरकार कायम राहिल असा टोला राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष तथा राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी लगावला. भाजपच्या अशाच भूलथापा आणि आश्वासनांना कंटाळून एकनाथ खडसे राष्ट्रवादीत आले, पुढील काही काळात आौरगाबादमधून देखील भाजपचे काही नेते,पदाधिकारी राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याचेही पाटील यांनी यावेळी सांगतिले.

मराठवा़डा पदवीधर मतदारसंघातून महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून सतीश चव्हाण यांच्या नावाची घोषणा काल करण्यात आली. त्यानंतर आज उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी जंयत पाटील शहरात आले होते. तत्पुर्वी महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करतांना जयंत पाटील यांनी भाजपमध्ये उमेदवारीवरून सुरू असलेले भांडण, किशोर शितोळे माझ्या जवळचे असूनही मी त्यांना उमेदवारी देऊ शकलो नाही या भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या विधानासह फडणवीस यांच्यावरही टिका केली.

जयंत पाटील म्हणाले, जनता भाजपच्या भूलथापांना कंटाळली होती आणि म्हणून राज्यात महाविकास आघाडीचा नवा प्रयोग झाला आणि शिवसेना-राष्ट्रवादी व काॅंग्रेस या तीन पक्षांचे आघाडी सरकार सत्तेवर आले. सत्तेवर आल्यानंतर काही महिन्यातच कोरोनाचे संकट आले, त्यामुळे सरकारचे सगळे लक्ष त्यावर केंद्रीत झाले, आर्थिक संकटही उभे राहिले, तरी आम्ही थांबलो नाही. विकासकामांच्या गतीला काहीसा ब्रेक लागला असला तरी आता परिस्थीती सुधारत असल्याने त्यालाही वेग येईल. पण भाजपकडून सातत्याने सरकारवर टिका आणि ते खाली खेचण्याची भाषा केली जाते.

देवेंद् फडणवीस हे दर तीन महिन्यांनी हे सरकार खाली खेचणारच असे सांगत असतात. असे सांगितल्या शिवाय त्यांचे सैन्य सोबत थांबणार नाही, म्हणून त्यांना हे वारंवार सांगावे लागते. पण सरकार खंबीर आणि मजबूत आहे, त्यामुळे त्यांनी कितीही प्रयत्न केला, वल्गना केल्या तरी सरकार पाचवर्ष कायम राहील. एक वर्ष सरले तशी पुढची चार वर्ष देखील सरतील आणि भाजपचे नेते सरकार खाली खेचणार हेच सांगत राहतील, असा टोला पाटील यांनी लगावला. 

मराठवाड्याच्या प्रश्नाांसाठी भांडणारा उ्मेदवार..

राष्ट्रवादी काॅंग्रेसने दिलेल्या सतीश चव्हाण यांना महाविकास आघाडीने उमेदवार म्हणून स्वीकारले याबद्दल मी शिवसेना, काॅंग्रेसचे आभार मानतो. सतीश चव्हाण यांनी विधान परिषदेत सातत्याने पदवीधर, शिक्षकांचे प्रश्न मांडले. विनाअनुदानित शाळांमधील शिक्षकांच्या वेतनाचा प्रश्न असेल, वैद्यकीय प्रवेशाच्या ७०ः३० फाॅर्म्युल्यामुळे मराठवाड्यातील विद्यार्थ्यांवर होणारा अन्याय असेल, नॅशनल लाॅ युनिव्ह्रसिटीची प्रश्न असेल या सगळ्यांवर आवाज उठवला. कृष्णा खोरे, नाशिकच्या धरणातून पाणी सोडण्याचा विषय असेल यावर देखील चव्हाण यांनी सभागृहात आक्रमकपणे बाजू मांडली आहे.

त्यामुळे पदवीधर आणि मराठवाड्यातील प्रश्नासांठी झटणारा व्यक्ती आपण निवडूण दिला पाहिजे. शिवसेना, काॅंग्रेस आणि राष्ट्रवादीचे सर्व पदाधिकारी हे काम निश्चित करतील असा विश्वास देखील पाटील यांनी व्यक्त केला.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख