बोराळकरांच्या प्रचारासाठी देवेंद्र फडणवीस, पंकजा मुंडे येणार.. - Fadnavis, Pankaja Munde will come for Boralkar's campaign | Politics Marathi News - Sarkarnama

बोराळकरांच्या प्रचारासाठी देवेंद्र फडणवीस, पंकजा मुंडे येणार..

सरकारनामा ब्युरो
रविवार, 22 नोव्हेंबर 2020

मराठवाडा पदवीधर निवडणुकीचे प्रमुख आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांच्यासह मराठवाड्यातील भाजपचे सर्व लोकप्रतिनिधी ताकदीनीशी प्रचारात उतरले आहेत. प्रत्यक्ष मतदान एक आठवड्यावर येऊन ठेपल्यामुळे आता मराठवाड्यात भाजपच्या राज्यातील नेत्याचे दौरे सुरू झाले आहेत. उद्या (ता.२३ ) सोमवार रोजी देवेंद्र फडणवीस व पंकजा मुंडे यांच्या औरंगाबाद दौऱ्याने याला सुरवात होत आहे.

औरंगाबाद ः भाजप महायुतीचे उमेदवार शिरीष बोराळकर यांच्या प्रचारासाठी विधान सभेतील विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, माजी मंत्री तथा भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे उद्या (ता.२३) रोजी शहरात येत आहेत. फडणवीस हे शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवरांशी चर्चा करणार आहेत. त्यानंतर दुपारी फडणवीस आणि मुंडे हे दोघेही एकत्रितपणे पदवीधर, भाजपचे लोकप्रतिनिधी, बुथप्रमुख व कार्यकर्त्यांच्या मेळाव्याला मार्गदर्शन करणार आहेत.

मराठवाडा पदवीधर मतदारसंघातून भाजपने शिरीष बोराळकर यांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर प्रचारात आघाडी घेतली आहे. मराठवाडाभर दौरे करत पदवीधर मतदारांशी थेट संपर्क साधण्यावर भर दिला जात आहे. लातूर, उस्मानाबाद, बीड, नांदेड, परभणी, जालना, हिंगोलीसह औरंगाबाद जिल्ह्यात भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते घरोघरी, संस्था, महाविद्यालयात जाऊन मतदारांच्या भेटी घेत आहेत.

मराठवाडा पदवीधर निवडणुकीचे प्रमुख आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांच्यासह मराठवाड्यातील भाजपचे सर्व लोकप्रतिनिधी ताकदीनीशी प्रचारात उतरले आहेत. प्रत्यक्ष मतदान एक आठवड्यावर येऊन ठेपल्यामुळे आता मराठवाड्यात भाजपच्या राज्यातील नेत्याचे दौरे सुरू झाले आहेत. उद्या (ता.२३ ) सोमवार रोजी देवेंद्र फडणवीस व पंकजा मुंडे यांच्या औरंगाबाद दौऱ्याने याला सुरवात होत आहे.

देवेंद्रजी फडणवीस हे सकाळी साडेनऊ वाजता हाँटेल अजंता अँम्बेसीटर येथे जिल्ह्यातील उद्योजक, संस्था चालक, डॉक्टर, वकील, अभियंते,  राष्ट्रीय खेळाडू अशा निमंत्रितासोबत  चर्चा करणार आहेत.  साडेअकरा वाजता याच ठिकाणी फडणवीस हे पत्रकारांशी संवाद साधणार आहेत. त्यानंतर  दुपारी १२ वाजता तापडीया नाट्य मंदिर, निराला बाजार येथे आमदार सर्व पदाधिकारी, बुथ प्रमुख, कार्यकर्ते यांच्या मेळावा होणार आहे. या मेळाव्याला देवेंद्र फडणवीस, पंकजा मुडे उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत.

Edited By : Jagdish Pansare

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख