मराठवाडा पदवीधरच्या निवडणूकीत महाविकास आघाडीकडून सोशल मिडियाचा प्रभावी वापर..

गेल्या दोन निवडणुकीत सतीश चव्हाण यांनी ते दाखवून दिले होते. तिसऱ्यांदा निवडणूक लढत असतांना राजकारणात सोशल मिडियाचा वाढता वापर लक्षात घेता चव्हाण व त्यांच्या टीमने या माध्यमाचा प्रभावीपणे वापर केल्याचे दिसून आले.महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्तेडोअर टू डोअर प्रचार करत असतांना इकडे पडद्यामागून चव्हाण यांची सोशल मिडियाची टिम देखील वेगवेगळ्या व्हिडिओ, आॅडिओ आणि छायाचित्रांच्या माध्यमातून पदवीधर मतदारांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न करत होते.
Satish Chavan Active in social media campaining news
Satish Chavan Active in social media campaining news

औरंगाबाद : मराठवाडा पदवीधर मतदारसंघातील प्रचाराच्या तोफा आज थंडावल्या. महविकास आघाडी विरुध्द भाजप महायुती अशी थेट लढत राज्याती  पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघात पहायला मिळेत. मराठवाडा पदवीधरचा विचार केला तर महाविकास आघाडीचे सतीश चव्हाण यांनी मतदारांच्या थेट भेटी, बैठका, सभा आणि मेळाव्याच्या माध्यमातून प्रचारात आघाडी घेतली. या शिवाय सोशल मिडियाचा पुरेपूर वापर करत त्यांनी या माध्यमातून देखील जोरदार प्रचार केला.

अगदी राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यापासून राज्यातील मंत्री, नेते ते मराठवाड्यातील महाविकास आघाडीचे आमदार, लोकप्रतिनि या सगळ्यांकडून सतीश चव्हाण यांना विजयी करण्यासाठीचे आवाहन करणाऱ्या व्हिडिओ क्लीप या प्रचारातील आकर्षण ठरल्या.

औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघाची निवडणूक १ डिसेंबर रोजी होत आहे. या निवडणुकीचे वैशिष्टंच हे काही जो उमेदवार सर्वाधिक मतदारांपर्यंत पोहचून त्यांचे मतदान करून घेण्यात यशस्वी होतो, तोच बाजी मारतो. गेल्या दोन निवडणुकीत सतीश चव्हाण यांनी ते दाखवून दिले होते. तिसऱ्यांदा निवडणूक लढत असतांना राजकारणात सोशल मिडियाचा वाढता वापर लक्षात घेता चव्हाण व त्यांच्या टीमने या माध्यमाचा प्रभावीपणे वापर केल्याचे दिसून आले.

महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते  डोअर टू डोअर प्रचार करत असतांना इकडे पडद्यामागून चव्हाण यांची सोशल मिडियाची टिम देखील वेगवेगळ्या व्हिडिओ, आॅडिओ आणि छायाचित्रांच्या माध्यमातून पदवीधर मतदारांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न करत होते.

बारा वर्षात पदवीधर आमदार म्हणून चव्हाण यांनी पदवीधर, शिक्षक, डाॅक्टर, वकील, सुशिक्षित बेरोजगार यांचे जे प्रश्न विधान परिषदेच्या सभागृहात मांडले, त्याचा मागोवा घेणाऱ्या, माहिती देणाऱ्या व्हिडिओ आणि आॅडीओ क्लीप गेल्या दोन आठवड्यापासून मोठ्या प्रमाणात चव्हाण यांच्या सोशल मिडिया टीमने व्हायरल केल्या. या शिवाय भानुदासराव चव्हाण प्रतिष्ठाणच्या वतीने निराधार, महिला तरूणांना केलेली मदत, मोफत आरोग्य सेवा याची माहिती, लाभार्थ्यांचे अनुभव कथन करणारे आकर्षक व्हिडिओ यांना देखील चांगला प्रतिसाद मिळाला.

व्ही कार्डच्या माध्यमातून एकाच क्लिक वर फेसबुक, व्हाट्सअप, ट्विटर, इन्स्टाग्राम, आदी पेजवर जाता येईल अशी व्यवस्था करण्यात आली होती.  या शिवाय सतीश चव्हाण यांनी केलेल्या कामाची माहिती, कार्य पूर्तता जाहीरनामा, आवाहन पत्र अशी सगळीच माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून मतदारांना पाठवण्यात आली. मतदारांना मतदार यादीत आपले नाव सहजपणे शोधता यावे यासाठी  satishchavan.in या वेबसाईटची देखील मोठी मदत झाली.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com