`स्वाराती`विद्यापीठातील अधिष्ठाता डाॅ.जाधव यांचा विष्णुपुरी प्रकल्पात बुडून मृत्यू

भगवान जाधव हे नेहमीप्रमाणे सोमवारी सकाळी शंकर जलाशयात पोहायला गेले. परंतु दुपारपर्यंत तेघरी परत न आल्याने घरच्यांनी शोधाशोध सुरू केली. सकाळी ते पोहायला गेले होते अशी माहिती मिळताच त्या ठिकाणी विद्यापीठातील अधिकारी व कर्मचारी यांच्यासह अनेकांनी धाव घेतली.
Swaratis dean dr. jadhav news nanded
Swaratis dean dr. jadhav news nanded

नांदेड: येथील स्वामी रामानंद तिर्थ विद्यापीठाचे अधिष्ठाता डॉ. भगवान जाधव यांचा विष्णुपूरी प्रकल्पात बुडून मृत्यू आल्याची घटना काल सकाळी घडली. डॉ. जाधव  हे गोदावरी नदी वरील विष्णुपूरी प्रकल्पात पोहण्यासाठी गेले होते. दुपार झाली तरी ते घरी परत न आल्याने कुटुंबियांनी जिवरक्षक दलाच्या मदतीने शोधाशोध सुरू केली. मात्र, रात्रीपर्यंत त्यांचा शोध लागला नाही. जिवरक्षकांनी आज सकाळी पुन्हा शोधकार्य सुरू केले असता भगवान जाधव यांचा म्रतदेह सापडला. पाण्याचा अंदाज आला नसल्याने जाधव यांचा बुडून म्रत्यू झाल्याचे बोलले जाते. त्यांच्या दुर्दैवी मृत्यूळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

दक्षिण काशी म्हणून प्रसिद्ध असलेले नांदेड जवळ असलेले विष्णुपुरी गावात काळेश्वर महादेवाचे मंदिर आहे. याच ठिकाणी आशिया खंडातील मोठा प्रकल्प असून शंकर जलाशय नावाने ओळखला जातो. पर्यटकांसह अनेक जण पोहण्यासाठी या ठिकाणी  येत असतात. सध्या लॉकडाउन असल्याने आणि मंदिर बंद असल्याने नेहमी सारखी वर्दळ या ठिकाणी नसते.

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील मानवविज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. भगवान जाधव (वय ५३) हे नेहमीप्रमाणे सोमवारी सकाळी शंकर जलाशयात पोहायला गेले.  परंतु दुपारपर्यंत ते घरी परत न आल्याने घरच्यांनी शोधाशोध सुरू केली. सकाळी ते पोहायला गेले होते अशी माहिती मिळताच त्या ठिकाणी विद्यापीठातील अधिकारी व कर्मचारी यांच्यासह अनेकांनी धाव घेतली.

घटनास्थळी त्यांची गाडी आणि कपडे आढळून आले. त्यामुळे डॉ. जाधव हे पाण्यात गेल्याची खात्री झाल्यानंतर तात्काळ मदतकार्य सुरू झाले. रात्री अंधार पडेपर्यंत अग्निशमन दल, ग्रामीण पोलीस निरीक्षक यांचे सहकारी, गोदावरी जीवरक्षक दल तसेच स्थानिक नागरिकांकडून शोध सुरु होता. दरम्यान डॉ. भगवान जाधव यांचा मृतदेह चोवीस तासानंतर विष्णुपुरी धरणात थुगाव-कोटतीर्थच्या कडेला मंगळवारी सकाळी तरंगतताना आढळला. शवविच्छेदन झाल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.  

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com