बाबांनो, कोरोनाचा नाद करू नका; माझी हाडं अजून दुखतात.. - Don't make a corona noise, my bones hurt even more .. | Politics Marathi News - Sarkarnama

बाबांनो, कोरोनाचा नाद करू नका; माझी हाडं अजून दुखतात..

जगदीश पानसरे
सोमवार, 26 ऑक्टोबर 2020

कृपा करून कोरोनाचा नाद करू नका, ज्याला झाला त्याला एकदा विचारा. `जिस पे बीतती है ना, उसेही समझता है`, माझी हाडं अजूनही दुखतात, तेव्हा काळजी घ्या, असा स्व अनुभव देखील धनंजय मुंडे यांनी मिश्किलपणे सांगितला. आपण जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यात आता कुठे यशस्वी झालो आहेत. पण हा आजार अजून पुर्णपणे नाहीसा झालेला नाही. तेव्हा सतर्क राहून कोरोना संसर्ग टाळण्यासाठी ज्या उपाययोजना सांगितल्या आहेत, त्याचे पालन करा,

औरंगाबाद ः  बाबांनो, तुम्हाला हात जोडतो, मला समोर अजूनही बरेच जण हे मास्क न घालता बसलेले दिसतायेत. कोरोना सारख्या जागतिक महामारीला इतक्या सहजतेने घेऊ नका, नाही नाही म्हणणाऱ्यांना तर कोरोना आधी होतो. तेव्हा जीव धोक्यात घालू नका, कोरोनाचा नाद करू नका, माझी हाडं अजून दुखतात, अशा शब्दांत सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी उपस्थितांना काळजी घेण्याचे आवाहन केले.

अंबाजोगाई तालुक्यातील येडेश्वरी सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगाम प्रसंगी धनंजय मुंडे बोलत होते. गेल्या सहा महिन्याहून अधिक काळापासून कोरोनाने देश, राज्य आणि मराठवाड्यात थैमान घातले आहे. लाखो लोकांना या जीवघेण्या आजाराची लागण झाली, तर हजारोंना आपले प्राणही गमवावे लागले. परंतु अजूनही लोक कोरोनाचे गांभीर्य ओळखून वागतांना दिसत नाहीत, याबद्दल धनंजय मुंडे यांनी यावेळी नाराजी आणि चिंता व्यक्त केली.

धनंजय मुंडे म्हणाले, कोरोनाचे जागतिक संकट हे खूप मोठे आहे, त्याचा प्रभाव कमी जरी झाला असलात तरी धोका टळलेला नाही, हे सगळ्यांनी लक्षात ठेवायला पाहिजे. मला काही होत नाही, असं म्हणणाऱ्यांनाच कोरोना आधी गाठतो. तुम्हाला हात जोडून विनंती करतो, मास्क वापरा तुमची आणि तुमच्या कुटंबाची काळजी घ्या. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उगाच माझे कुटुंब माझी जबाबदारी ही संकल्पना राज्यात राबवलेली नाही. त्यामागे आपल्या कुटुंबाची जबाबदारी आपली असल्याची भावना आहे.

तेव्हा कृपा करून कोरोनाचा नाद करू नका, ज्याला झाला त्याला एकदा विचारा. `जिस पे बीतती है ना, उसेही समझता है`, माझी हाडं अजूनही दुखतात, तेव्हा काळजी घ्या, असा स्व अनुभव देखील धनंजय मुंडे यांनी मिश्किलपणे सांगितला. आपण जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यात आता कुठे यशस्वी झालो आहेत. पण हा आजार अजून पुर्णपणे नाहीसा झालेला नाही. तेव्हा सतर्क राहून कोरोना संसर्ग टाळण्यासाठी ज्या उपाययोजना सांगितल्या आहेत, त्याचे पालन करा, असे आवाहनही धनंजय मुंडे यांनी यावेळी केले.

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला तेव्हा, अनेक राजकीय नेते आणि पुढाऱ्यांना या रोगाने आपल्या कव्हेत घेतले होते. त्यापैकीच एक असलेले धनंजय मुंडे यांनी कोरोनावर मात करत पुन्हा नव्या जोमाने कामाला सुरूवात केली होती. पण कोरोना संसर्ग झालेला काळ, त्रास हा किती जास्त असतो, याची जाणीव त्यांनी मास्क न वापरणाऱ्यांना करून दिली.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख