माझा घटस्फोटासाठी अर्ज, दानवेंचा जावई म्हणून नका

मी घटस्फोटाचा निर्णय घेऊन तशी याचिका देखील न्यायालयात दाखल केली आहे. त्यामुळे माझा आता पत्नी व सासऱ्यांशी कुठालाही संबंध उरलेला नाही. तेव्हा दानवेंचा जावई किंवा संजनाचा पती असा माझा उल्लेख कुणीही करू नये.
harshvardhan jadhav  news from aurangabad
harshvardhan jadhav news from aurangabad

औरंगाबाद ः वैयक्तिक, कौटुंबिक गोष्टी चव्हाट्यावर आणू नये हे जरी खरे असले तरी माझी परिस्थिती जरा वेगळी आहे. मी आणि माझी पत्नी संजना जाधव आम्ही दोघे सामाजिक, राजकीय जीवनात वावरत असल्याने काही गोष्टींचा खुलासा होणे गरजेचे आहे.  मी घटस्फोटासाठी न्यायालयात याचिका दाखल केलेली आहे, त्यामुळे माझा उल्लेख यापुढे रावसाहेब दानवे यांचा जावई असा कृपया करू नये. माझा आणि त्यांचा आता कुठलाह संबंध उरलेला नाही, असे सांगत माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी आणखी एक व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल करून खळबळ उडवून दिली.

हर्षवर्धन जाधव यांनी यापुर्वीही सोशल मिडियावर अनेक व्हिडिओ जारी करत आपले कौटुंबिक वाद सार्वजनिक केले होते. सासऱ्यांकडून आपल्याला धमक्या, त्रास दिला जात असल्यापासून आत्महत्येस प्रवृत्त केले जात असल्या सारखे गंभीर आरोप जाधव यांनी केले होते. एवढेच नाही तर राजकारणातून संन्यास घेत पत्नीला आपला राजकीय वारस घोषित केल्यानंतर जाधव हे काही काळ राजकारण आणि प्रसारमाध्यमांपासून देखील दूर होते.

परंतु पुन्हा सक्रीय होत त्यांनी आंदोलन, मतदारसंघातील प्रश्न, पीक कर्ज, खत वाटप, लॉकडाऊनच्या काळात कर्जवसुलीसाठी बॅकांकडून सुरू असलेला तगादा या सारखे विषय आपल्या शिवस्वराज्य बहुजन संघटनेच्या माध्यमातून हाती घेतले. पण आज अचानक जाधव यांनी पुन्हा सोशल मिडियावर व्हिडिओ प्रसारित करत मोठा खुलासा केला.

या व्हिडिओमध्ये हर्षवर्धन जाधव म्हणाले, मी डिप्रेशनमधून बाहेर येऊन नव्या जोमाने सामाजिक कामाला लागलो आहे. गेली काही महिने माझ्यासाठी खूप कठीण गेली, मला धमक्या आल्या, पण या सगळ्यामधून मी बाहेर पडलो. मात्र अद्यापही मला त्रास देणे सुरूच आहे, त्यामुळे मी घटस्फोटाचा निर्णय घेऊन तशी याचिका देखील न्यायालयात दाखल केली आहे. त्यामुळे माझा आता पत्नी व सासऱ्यांशी कुठालाही संबंध उरलेला नाही. तेव्हा दानवेंचा जावई किंवा संजनाचा पती असा माझा उल्लेख कुणीही करू नये.

राजकारणातून संन्यास घेण्याचा आणि पत्नीला राजकीय वारस ठरवण्याचा निर्णय देखील मी आता रद्द केला आहे. भविष्यात राजकारणात कुठली दिशा घ्यायची हे मी वेळ आल्यावर ठरवीन. या संपुर्ण परिस्थितीतून बाहेर पडण्याचा आणि येणाऱ्या प्रत्येक प्रसंग आणि संकटाला खंबीरपणे तोंड देण्याचा माझा निर्धार असल्याचेही जाधव यांनी म्हटले आहे. 

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com