धस-धोंडे एकाच दिवशी, एकाच ठिकाणी, पण दिसले स्वंतत्र बाकावार...

एकाच पक्षात असलेले आमदार सुरेश धस व आमदार भिमराव धोंडे या दोघांच्याही न्यायालयीन प्रकरणांची सुनावणी योगायोगाने एकाच दिवशी आहे.
Mla dhus-dhonde news aashti-beed
Mla dhus-dhonde news aashti-beed

बीड : एकाच पक्षात असले तरी कायम अंतर्गत धुसफुस असलेले भाजप आमदार सुरेश धस व माजी आमदार भिमराव धोंडे न्यायालयीन सुनावणीच्या निमित्ताने एकत्र आले. पण, पुकार होण्याची वाट पाहत बसलेले हे दोन्ही नेते एकाच रांगेत पण वेगवेगळ्या बाकड्यांवर बसलेले दिसले.

पुर्वी राष्ट्रवादीत असलेले भीमराव धोंडे २०१४ मध्ये भाजपात आले आणि राष्ट्रवादीच्या सुरेश धसांचा पराभव करुन आमदार झाले. तर, जिल्हा परिषद निवडणुकीच्या निमित्ताने सुरेश धस भाजपात आले. नंतर स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीतून त्यांनीही विधान परिषदेत प्रवेश केला. सरत्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे उमेदवार असलेले भिमराव धोंडे यांचा पराभव झाला. धोंडे समर्थकांनी पराभवाचे खापर धसांवरही फोडले.

आता एकाच पक्षात असले तरी धस व धोंडे यांचे पक्षीय कार्यक्रम, पक्षीय आंदोलनेही वेगवेगळीच असतात. पण, योगायोगाने गुरुवारी दोघांवरील न्यायालयीन सुनावणीची तारीख एकाच न्यायालयात आणि एकाच दिवशी आली. कोरोना विषाणू संसर्गाचा फैलाव सुरु झाला आणि शासनाने लॉकडाऊन जाहीर केले. या काळातच ऊसतोडणी कामगार परतत होते. त्यांना जिल्ह्यात आणण्यासाठी मदतीला धाऊन गेलेल्या सुरेश धस यांच्यावर जिल्हाबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याचा गुन्हा नोंद झाला.

धस पुणे जिल्ह्यातील भिगवण व अहमदनगर जिल्ह्यातील खेड येथे पोलिसांनी अडविलेल्या मजूरांच्या मदतीला धावले होते. या दाखल गुन्ह्याप्रकरणी धसांवर हजर राहण्याचे वॉरंट होते. त्यामुळे गुरुवारी स्थानिक न्यायालयात सुनावणीसाठी धस स्वत: हजर झाले. याच दिवशी एका आचारसंहिता भंगाच्या गुन्ह्यातील भिमराव धोंडे यांच्याबाबतची तारीखही याच दिवशी आणि आष्टी येथील न्यायालयातच होती. त्यामुळे धोंडेही इथे होते. दोघे एकाच न्यायालयात, एकाच दिवशी आले. पण, पुकार होण्याची वाट पाहत बसलेले धस - धोंडे थोडे अंतर राखूनच बसल्याचे दिसले. दोघांनीही बसण्यासाठी वेगवेगळे बाकडे वापरले.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com