बंजारा विकास प्राधिकरण स्थापन करण्याची मु्ख्यमंत्र्यांकडे मागणी..

या भेटीत त्यांनी प्रामुख्याने बंजारा सामाजाच्या विकासासाठी स्वतंत्र प्राधिकरणाची स्थापना करावी, तसेच मुंबईत बंजारा भवन उभारावे, जेणेकरून दुर्लक्षित असलेल्या या समाजाला न्याय मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली.
Mla rajesh Rathod Meet CM udhav Thackeray news
Mla rajesh Rathod Meet CM udhav Thackeray news

औरंगाबाद ः बंजारा समाजाच्या विकासासाठी स्वतंत्र प्राधिकरणाची स्थापना करून मुंबईत बंजारा भवन उभारावे, यासह अन्य मागण्यासाठी काॅंग्रेसचे आमदार राजेश राठोड यांनी नुकतीच मुंबईत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन निवेदन दिले. बंजारा समाजाच्या प्रश्नांकडे गेल्या अनेक वर्षांपासून दुर्लक्ष होत आहे, या समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी बंजारा विकास प्राधिकरणाला तातडीने मान्यता द्यावी, असा आग्रह देखील राठोड यांनी या भेटीत धरला.

गेली अनेक वर्ष राजेश राठोड हे काॅंग्रेसमध्ये कार्यरत आहेत. युवक काॅंग्रेसचे पदाधिकारी म्हणून काम करत असतांना त्यांनी बंजारा समाजाच्या विद्यार्थ्यांचे प्रश्न राज्य व राष्ट्रीय पातळीवर मांडले. युवक काॅंग्रेसचे काम करत असतांनाच ते जालना जिल्ह्यात देखील सक्रीय होते. काही महिन्यांपुर्वी विधान परिषदेच्या बिनविरोध निवड झालेल्या सदस्यांमध्ये काॅंग्रेसकडून राजेश राठोड यांनी संधी मिळाली आणि ते आमदार झाले. बंजारा समाजाच्या विकासासाठी आपण या आमदारकीचा वापर करू, असा विश्वास त्यांनी विजयानंतर व्यक्त केला होता. त्यादृष्टीने राठोड यांनी प्रयत्न सुरू केले आहेत.

राजेश राठोड यांनी नुकतीच बंजारा समाजाच्या शिष्टमंडळासह वर्षा निवासस्थानी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी प्रामुख्याने बंजारा सामाजाच्या विकासासाठी स्वतंत्र प्राधिकरणाची स्थापना करावी, तसेच मुंबईत बंजारा भवन उभारावे, जेणेकरून दुर्लक्षित असलेल्या या समाजाला न्याय मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली. मुंबईच्या चांदिवली भागात असलेल्या संत सेवालाल महाराज यांच्या मंदिराला संरक्षण द्यावे, अशी मागणी देखील केली.

या शिवाय अतिवृष्टीमुळे जालना जिल्ह्यात झालेल्या शेती व फळबागांच्या नुकसानीची भरपाई म्हणून शेतकऱ्यांना सरसकट मदत देऊन दिलासा द्यावा, मंठा तालुक्यातील विकासकामांसाठी भरीव निधीची तरतूद करावी, अशी मागणी देखील राठोड यांनी या भेटीत केली. यावेळी बंजारा समाजाचा पारंपारिक शेला देऊन मुख्यमंत्र्याचे स्वागतही करण्यात आले.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com