बदलीच्या मानसिक तणावातून आरटीओच्या कंत्राटी वाहनचालकाचा मृत्यू…

जालना (Jalna) आरटीओ (RTO) कार्यालयातून (उपप्रादेशिक परिवहन कार्यालय) औरंगाबाद (Aurangabad) आरटीओ कार्यालयात बदली झाल्याच्या मानसिक तणावातून एका कंत्राटी वाहन चालकाचा हृदयविकाराच्या झटक्याने दुर्दैवी मृत्यू झाला.
बदलीच्या मानसिक तणावातून आरटीओच्या कंत्राटी वाहनचालकाचा मृत्यू…
RTO Ourangabad JalnaSarkarnama

जालना : जालना (Jalna) आरटीओ (RTO) कार्यालयातून (उपप्रादेशिक परिवहन कार्यालय) औरंगाबाद (Aurangabad) आरटीओ कार्यालयात बदली झाल्याच्या मानसिक तणावातून एका कंत्राटी वाहन चालकाचा हृदयविकाराच्या झटक्याने दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना औरंगाबाद शहरात घडली.

दीपक विठ्ठलराव डोळस असे या कंत्राटी वाहनचालकाचे नाव आहे. जालना आरटीओ कार्यालयात ते गेल्या दहा वर्षांपासून कार्यरत होते. गेल्या चार दिवसांपूर्वी त्यांची बदली झाल्याची ऑर्डर त्यांना मिळाली. तेव्हापासून ते अस्वस्थ होते. कंत्राटी वाहनचालकाच्या कमी पगारात औरंगाबादमध्ये कस भागणार म्हणून ते मानसिक तणावात होते. १ जून रोजी जालन्यावरून औरंगाबाद येथील कार्यालयात रुजू होण्यासाठी आले असताना त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यातच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला असल्याचा आरोप कुटुंबीयांकडून केला जात आहे.

दीपक डोळस आधीच कंत्राटी तत्वावर कमी पगारात काम करत होते. त्यातच त्यांची बदली अचानक औरंगाबाद येथील कार्यालयात वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दबाव तंत्राचा वापर करून जबरदस्तीने बदली लादली असल्याचा आरोपही आता कुटुंबीयांकडून केला जात आहे. मानसिक तयारी नसतानासुद्धा त्यांची बदली औरंगाबादला करण्यात आल्याने त्यांना हृदयविकाराचा झटका आल्यानेच त्यांचा मृत्यू झाला, असा कुटुंबीयांचा आरोप आहे. अन्यायकारक बदल्यांच्या विरोधात काही वाहनचालक परिवहन मंत्री अनिल परब यांची भेट घेणार असल्याचीही माहिती आहे.

कंत्राटी कामगाराचा वेतनाचा प्रश्न या निमित्याने पुन्हा एकदा समोर आला आहे. नियमांनुसार कंत्राटी कामगारांच्या बदल्या करता येतात का, असाही प्रश्न ही यानिमित्याने पुढे आला असून, या मृत्यू प्रकरणी काही संघटना आज परिवहन मंत्र्यांना भेटणार असल्याची माहिती ही समोर आली आहे. या कंत्राटी वाहन चालकाच्या मृत्यू प्रकरणी संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई करण्याची मागणीसुद्धा करणार असल्याचे सांगण्यात आले आहे. या घटनेने पुन्हा एकदा कंत्राटी कामगाराचे प्रश्‍न ऐरणीवर आले आहेत.

RTO Ourangabad Jalna
Imtiaz jalil : पालकमंत्री साहेब, औरंगाबाद आमचा बालेकिल्ला म्हणता ना, मग शहरासाठी काय केलं ?

बदलीचा आदेश हाती आल्यापासून बदली झाल्यावर आपल्या परिवाराचे कसे होणार या तणावात रात्रभर त्यांना झोपसुद्धा लागली नाही. बदलीच्या ठिकाणी रुजू झाल्यानंतर त्यांना हार्ट अटॅक आल्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचे कुटुंबीयांनी सांगितले. त्यांच्या मागे मोठा आप्तपरिवार आहे. कंत्राटी काम करत असताना कमी पगारात कसे जीवन जगायचे, ही चिंता त्यांना नेहमीच भेडसावत होती. त्याचे टेन्शन त्यांनी घेतलेले होते. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कंत्राटी कर्मचाऱ्यांना कुठल्याही सवलती लागू नसताना दीपक यांची बदली करण्यात केली. नव्हे जबरदस्ती ही बदली त्यांच्यावर लादण्यात आलेली होती. मानसिकता नसतानासुद्धा त्यांना बदलीच्या ठिकाणी जावे लागल्यामुळे त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला व त्यातच त्यांचा मृत्यू झाल्याचे त्यांच्या कुटुंबीयांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in