Crime News : संतापजनक ! नाईट ड्युटीवर असणाऱ्या सहाय्यक पोलीस आयुक्तानं काढली महिलेची छेड

Aurangabad Crime News : या घटनेमुळे औरंगाबाद पोलीस दलात खळबळ...
Aurangabad Crime News
Aurangabad Crime NewsSarkarnama

Aurangabad Crime News : महिलांवरील अत्याचारांच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असताना पोलिसांकडे मदतीचा आधार म्हणून पाहिलं जात असते. मात्र याचदरम्यान, नाईट ड्युटीवर असणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यानं मध्यरात्री एका घरात घुसून महिलेची छेड काढल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेमुळे औरंगाबाद पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे.

याप्रकरणी औरंगाबाद शहरातील सिटी चौक पोलीस ठाण्यात सहायक पोलीस आयुक्तावर गुन्हा(Crime) दाखल करण्यात आला आहे. विशाल ढुमे असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या अधिकार्याचं नाव आहे. सहायक पोलीस आयुक्त ढुमे याने नाईट ड्युटीवर असताना रात्री दोनच्या सुमारास एका घरात घुसून महिलेची छेड काढली. ही घटना शहरातील एका उच्चभ्रू परिसरात शनिवारी मध्यरात्री घडली. यामुळे पोलीस अधिकार्यांच्या या कृत्यावर शहरात तीव्र पडसाद उमटले आहेत. तसेच या धक्कादायक प्रकारांनी महिलांकडून देखील संताप व्यक्त केला जात आहे.

Aurangabad Crime News
Narayan Rane-Sanjay Raut Controversy: संजय राऊत खासदार झाले, हे तर माझेच पाप; असं का म्हणाले, नारायण राणे

मिळालेल्या माहितीनुसार, सहायक पोलीस आयुक्त विशाल ढुमे (Vishal Dhume) रात्री एका हॉटेलमध्ये दारु पिण्यासाठी गेले होते. त्यावेळी त्यांचा मित्र आपल्या पत्नीसोबत त्याठिकाणी आले होते. तिथे दोघांची भेट झाली. ढुमे यांनी आपल्याकडे गाडी नसल्याचं सांगत मित्राकडे लिफ्ट मागितली. त्यानंतर मित्रानं त्यांना आपल्या गाडीत बसवलं. मात्र, गाडीत बसल्यानंतर ढुमे यांनी दारुच्या नशेत मित्राच्या पत्नी महिलेची छेड काढण्यास सुरुवात केली.

Aurangabad Crime News
BrijBhushan Singh News : भाजप खासदाराने मानले राज ठाकरेंचे आभार ; म्हणाले, '..तो विषय आता..'

त्यानंतर काही अंतरावर गेल्यावर त्यांनी वॉशरुमला जायचं कारण पुढं करत तुमच्या घरी घेऊन चल अशी विनंती मित्राला केली. घरी गेल्यानंतरही ढुमे यांनी महिलेची छेड काढली. तसेच पीडित महिलेच्या पतीला मारहाण केली. यानंतर संबंधित पोलीस अधिकार्याविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास औरंगाबाद शहर पोलीस करत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com