पदवीधरांचे प्रश्न सभागृहात मांडणारा, त्यासाठी भांडणारा उमेदवार निवडून द्या... - Choose a candidate who raises questions of graduates in the House and fights for it | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

शरद पवार म्हणतात, "मला वाटतं मुख्यमंत्री व्हावं, कुणी करणार का.."
धनंजय मुंडे यांच्यावरील बलात्काराची तक्रार मागे

पदवीधरांचे प्रश्न सभागृहात मांडणारा, त्यासाठी भांडणारा उमेदवार निवडून द्या...

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 24 नोव्हेंबर 2020

केवळ प्रश्न मांडून शांत बसणे ही त्यांची कार्यपद्धती नाही, तर प्रश्न मांडणे आणि त्यांची सोडवणूक करुन घेण्यासाठी सभागृहात भांडणे हा त्यांच्या स्वभाव राहिलेला आहे. त्यामुळे त्यांना अनेक प्रश्न मार्गी लावण्यात यश आले आहे.

औरंगाबाद ः मराठवाड्यातील पदवीधर आणि सर्वसामान्यांचे प्रश्न महाविकास आघाडीचे उमेदवार आणि गेली दोन टर्म या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे सतीश चव्हाण यांनी मांडलेले आहेत. एवढेच नाही तर ते सोडवून घेण्यासाठी ते भांडलेले देखील आहेत. अशा उमेदवाराला पुन्हा एकदा पदवीधर मतदारांनी संधी द्यावी, असे आवाहन राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी केले आहे.

मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचा प्रचार आता अंतिम टप्यात पोहचला आहे. महाविकास आघाडी विरुध्द भाजप महायुती यांच्यात थेट होणाऱ्या लढतीसाठी दोन्ही बाजूने जोर लावण्यात येत आहे. सतीश चव्हाण यांनी गेल्या दोन टर्म म्हणजे बारा वर्ष या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले आहे. या काळात केलेल्या कामाची पावती म्हणून पदवीधरांनी त्यांनी तिसऱ्यांदा संधी द्यावी, असे आवाहन महाविकास आघाडीचे सर्वच नेते, मंत्री करतांना दिसतायेत.

राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी देखील सतीश चव्हाण यांना विजयी करावे, असे आवाहन सोशल मिडियाच्या माध्यमातून केले आहे. गेली अनेक वर्ष आम्ही सतीश चव्हाण यांचे सभागृहातील काम पाहत आहोत. मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे ते प्रतिनिधित्व करत असले तरी सभागृहात पदवीधरांसोबतच सर्वसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम ते सातत्याने करत आहेत.

केवळ प्रश्न मांडून शांत बसणे ही त्यांची कार्यपद्धती नाही, तर प्रश्न मांडणे आणि त्यांची सोडवणूक करुन घेण्यासाठी सभागृहात भांडणे हा त्यांच्या स्वभाव राहिलेला आहे. त्यामुळे त्यांना अनेक प्रश्न मार्गी लावण्यात यश आले आहे. यापुढे देखील पदवीधर, व मराठवाड्यातील सर्व सामान्यांचे प्रश्न पोटतिडकीने सभागृरासमोर ठेवून सोडवूण घेण्यासाठी ते आणखी एक संधी  मागत आहेत. पदवीधरांनी मतपत्रिकेवरील क्रमांक एक समोर पहिली पसंती नोंदवूण त्यांनी प्रचंड मतांनी विजयी करावे, असे आवाहन देखील भुजबळ यांनी केले आहे.

Edited By : Jagdish Pansare

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख