मुख्यमंत्र्यांची शेतकऱ्यांना मदत करण्याची खूप इच्छा, पण कोरोना संकटामुळे अडचण.. - The Chief Minister is very keen to help the farmers, but the problem is due to the Corona crisis | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

उर्मिला मातोंडकर मातोश्रीवर दाखल

मुख्यमंत्र्यांची शेतकऱ्यांना मदत करण्याची खूप इच्छा, पण कोरोना संकटामुळे अडचण..

दत्ता देशमुख
सोमवार, 19 ऑक्टोबर 2020

केंद्राकडे जीएसटीचे २८ हजार कोटी रुपये थकल्याचेही सत्तार यांनी सांगितले. मागच्या वेळी अतिवृष्टीनंतर सत्तेत नसताना जिल्ह्यात आलेले उद्धव ठाकरे यांनी हेक्टरी ५० हजार हजारांची मागणी केली होती. आता ती देणार का? या प्रश्नावर मुख्यमंत्र्यांची खुप इच्छा आहे. मात्र, कोरोनाच्या संकटामुळे जगच अडचणीत आहे. राज्याची हीच परिस्थिती.

बीड : पिकांची चांगली परिस्थिती तीथे सरसकट मदत शक्य नाही. सरकसट ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होत असली तरी तसे करता येणार नाही. शेतकऱ्यांना भरपूर मदत द्यायची उद्धव ठाकरे यांची इच्छा आहे. पण, कोरोनाचे संकट असल्याने अडचण आहे, असे  महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी सांगितले.

सत्तार यांनी सोमवारी गेवराई तालुक्यातील पांढरवाडी, पाचेगाव, पाडळशिंगी तसेच बीड तालुक्यातील माळापूरी, लोळदगाव या ठिकाणी अतिवृष्टीने झालेल्या पीक नुकसानीची पाहणी केली. बीड बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांशी संवाद साधला. त्यानंतर त्यांनी महसूल व कृषी विभागाचा आढावा घेऊन पत्रकारांशी संवाद साधला.

पत्रकार परिषदेत अब्दुल सत्तार यांनी सरकार शेतकऱ्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे  राहणार असे सांगतानाच सरकारची हातबलताही सांगीतली. केंद्र सरकारकडून अपेक्षा व्यक्त करत त्यांनी विरोधी पक्षाकडेही बोट दाखविले. अब्दुल सत्तार म्हणाले, अतिवृष्टी, पुर, वादळामुळे सोयाबीन, कापूस, उडीद, खरीप ज्वारी, ऊस तसेच रेशीम व पपईचे मोठे नुकसान झाले आहे. आतापर्यंत केलेल्या पंचनाम्यात ९० हजार हेक्टरांवरील ६० कोटींच्या नुकसानीचा आकडा समोर आला आहे.

मात्र, पंचनामे सुरुच असून एकही शेतकरी यातून सुटणार नाही यासाठी शासन व प्रशासन दक्ष आहे. शेतकऱ्यांना जात, पक्ष नसतो. विरोधी पक्षनेत्यांनी केंद्र सरकारकडून राज्याला मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत. केंद्राकडे जीएसटीचे २८ हजार कोटी रुपये थकल्याचेही सत्तार यांनी सांगितले. मागच्या वेळी अतिवृष्टीनंतर सत्तेत नसताना जिल्ह्यात आलेले उद्धव ठाकरे यांनी हेक्टरी ५० हजार हजारांची मागणी केली होती. आता ती देणार का? या प्रश्नावर मुख्यमंत्र्यांची खुप इच्छा आहे. मात्र, कोरोनाच्या संकटामुळे जगच अडचणीत आहे. राज्याची हीच परिस्थिती असल्याचेही अब्दुल सत्तार म्हणाले. 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घरात बसू नका, शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी करण्याच्या सुचना दिल्याने आम्ही फिरत आहोत. आपला काहीही वांदा झाला तरी बांधावर जायचे ठरविले आहे. मात्र, घरात कोण बसले या प्रश्नावर ‘पुन्हा येईल म्हणालेले’ घरात बसले. पुर्वी अंब्याच्या झाडाखाली होते, आता बाभळीच्या असा टोलाही त्यांनी लगावला.

पत्रकार परिषदेत माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर, बदामराव पंडित, शिवसेना जिल्हा प्रमुख कुंडलिक खांडे, सचिन मुळूक, नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर, जिल्हाधिकारी राहूल रेखावार, मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार, पोलिस अधीक्षक राजा रामास्वामी, निवासी उपजिल्हाधिकारी संतोष राऊत, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजेंद्र निकम आदी उपस्थीत होते.

Edited By : Jagdish Pansare

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख