भाजप आमदार अतुल सावे यांच्या विरोधातही गुन्हा दाखल

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरात लागू असलेल्या आपत्ती व्यवस्थापन कायद्या अंतर्गत नियमांचे उल्लंघन केल्याची फिर्याद दिली. यावरून आमदार अतुल सावे यांच्या १४ ते १५ जणांविरुध्द पुंडलीकनगर पोलीस ठाण्यात आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ चे कलम ५१ ते ६० व भादंवि कलम १८८ नूसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
police file fir against bjp mla atul save news
police file fir against bjp mla atul save news

औरंगाबाद ः अयोध्येत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ५ आॅगस्ट रोजी राम मंदिर भुमीपूजनाचा सोहळा पार पडला. त्याचवेळी राज्यातील विविध भागात भाजपच्या वतीने आनंदोत्सव साजरा करण्यात आला. औरंगाबाद पुर्वचे भाजप आमदार अतुल सावे यांनी देखील मतदारसंघातील गजानन महाराज मंदीर चौकात जमावंबदी आदेशाचे उल्लंघन करत श्रीरामाचे पुजन आणि आनंदोत्सव साजरा केला. या प्रकरणी पोलिसांनी अतुल सावे यांच्यासह चौदा ते पंधरा भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

अयोध्येत पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या उपस्थितीत नुकतेच राम मंदिराचे भुमीपूजन झाले. देशभरात भाजप व हिंदुत्ववादी जनतेकडून याबद्दल जल्लोष साजरा झाला. औरंगाबादेत शहराच्या विविध भागात भाजपने श्रीराम पुजन आणि लाडू, पेढे वाटप या घटनेचा आनंदोत्सव साजरा केला.

भाजप आमदार अतुल सावे यांच्या मतदारसंघातील गजानन महाराज चौकात अतुल सावे, भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष संजय केणेकर, भाजपचे प्रवक्ते शिरीष बोराळकर, माजी नगरसेवक प्रमोद राठोड, कचरू घोडके, भगवान घडामोडे, अशोक दामले यांच्यासह ७ ते ८ पदाधिकारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास जमले होते.

यावेळी चौकात श्रीरामाच्या प्रतिमेचे पूजन, आरती करत नागरिकांना लाडू वाटण्यात आले. यावेळी पुंडलीकनगर पोलिस स्टेशनमधील गोपनीय पेट्रोलिंग करणारे कॉन्स्टेबल शिवाजी उगले यांनी अतुल सावे यांच्यासह भाजपच्या अन्य पदाधिकाऱ्यांना पोलीस आयुक्तांच्या आदेशाची माहिती देत कार्यक्रम न घेण्याचे सुचवले.

परंतु उपस्थित सर्वांनी त्याकडे दुर्लक्ष केले आणि कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरात लागू असलेल्या आपत्ती व्यवस्थापन कायद्या अंतर्गत नियमांचे उल्लंघन केल्याची फिर्याद दिली. यावरून आमदार अतुल सावे यांच्या १४ ते १५ जणांविरुध्द पुंडलीकनगर पोलीस ठाण्यात आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ चे कलम ५१ ते ६० व भादंवि कलम १८८ नूसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  

यामुळे संतप्त झालेले आमदार अतुल सावे, शहर-जिल्हाध्यक्ष संजय केणेकर यांनी महाराष्ट्रात निझामाचं राज्य आहे का, असा सवाल करत ठाकरे सरकारचा निषेध केला होता. अतुल सावे यांनी उद्धव ठाकरेंच्या सरकारमध्ये श्रीरामाची पुजा करण्यापासून आम्हाला रोखले जाते हे अत्यंत दुर्दैवी आहे. राज्यात निझामांच सरकार आहे का, आम्ही ठाकरे सरकारचा निषेध करतो असे म्हणत नाराजी व्यक्त केली. 

दरम्यान, पोलिसांकडून दाखल केल्या जात असलेल्या गुन्ह्याचा व राज्य सरकारचा निषेध म्हणून भाजपने रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा पत्रकार परिषद घेऊन केला. राज्यातील सरकार हे दडपशाहीने वागत असून शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांच्या दबावामुळेच भाजपच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल केले जात असल्याचा आरोपही भाजपने केला आहे. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com