भाजप उद्धव ठाकरेंना पाठवणार पंचवीस हजार पत्र, दहा हजार मेल

आमदार अतुल सावे म्हणाले, रामाची पुजा केली म्हणून सरकारने आमच्यावर गुन्हे दाखल केले. याबद्दल भाजप कार्यकर्त्यांच्या मनामध्ये प्रचंड चीड आहे. आम्हीही रामाचे पुजन केले मग आमच्यावरही गुन्हे दाखल करा, असा संताप त्यांच्याकडून व्यक्त होत आहे. हा संताप मु्ख्यमंत्र्यांपर्यत पोहचवण्यासाठीच आजपासून पत्र आणि मेल पाठवण्याच्या मोहिमेला सुरूवात करण्यात आली आहे.
bjp send twenty five thousand letter and ten thousand mail to cm news
bjp send twenty five thousand letter and ten thousand mail to cm news

औरंगाबाद ः  अयोध्येत ५ आॅगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राम मंदिर निर्माण भुमीपूजन सोहळा पार पडला. त्यानंतर राज्यासह औरंगाबादेत भाजपच्या कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी रामाचे पुजन करत आनंदोत्सव साजरा केला होता. परंतु परवानगी नसतांना पुजन आणि जल्लोष साजरा केल्याप्रकरणी पोलिसांनी भाजप पदाधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल केले. या विरोधात आक्रमक होत भाजपने मुख्यमंत्र्यांना २५ हजार पत्र आणि १० हजार मेल पाठण्याचे नवीन आंदोलन हाती घेतले आहे. आजपासून या मोहिमेला सुरूवात झाली असून पत्र आणि मेल पाठवण्याचे निर्धारित लक्ष्य साध्य होईपर्यंत ही ्मोहीम सुरू राहणार आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहर व जिल्ह्यात जमावबंदी आदेश लागू करण्यात आले आहे. त्यामुळे कोणत्याही प्रकारचे आंदोलन, आनंदोत्सव किंवा एकत्रित जमण्यास आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ नूसार बंदी घालण्यात आली आहे. पंरतु असे असतांना पाच आॅगस्ट रोजी शहराच्या विविध भागात, चौकात व मुख्य रस्त्यांवर भाजपच्या वतीने अयोध्येतील श्रीराम मंदिर भुमीपूजन सोहळ्याचा आनंदोत्सव साजरा करण्यात आला.

पोलीसांनी भाजप पदाधिकारी कार्यकर्त्यांना पोलिसांनी नोटीसा बजावून कुठलाही सार्वजनिक कार्यक्रम घेऊ नये असे बजावले होते. भाजपचे आमदार अतुल सावे, शहर जिल्हाध्यक्ष संजय केणेकर यांच्यासह भाजपच्या शेकडो कार्यकर्त्यांनी पुंडलीकनगर, गजानन महाराज मंदीर, गुलमंडी आदी भागात श्रीरामाच्या प्रतिमेचे पुजन करत लाडू आणि पेढ्यांचे वाटप केले होते.

पोलिसांनी अनेक ठिकाणी भाजप कार्यकरत्यांना रोखण्याचा प्रयत्न केला, ्त्यामुळे वादावादी देखील झाली. जमावबंदीचे उल्लंघन केल्याप्रकरणी पोलीसांनी दुपारनंतर भाजप पदाधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यास सुरूवात केली. सिटीचौक, पुंडलीकनगर पोलीस ठाण्यात अनेकांवर गुन्हे दाखल करण्यात आले. राज्य सरकारच्या या कारवाईमुळे भाजपमध्ये संतापाची लाट उसळली आणि हे निझामाचे सरकार आहे का, असा सवाल आमदार अतुल सावे, संजय केणेकर यांनी उपस्थित करत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व राज्यातील आघाडी सरकारचा निषेध नोंदवला.

भाजप पदाधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचे सत्र दोन-तीन दिवस सुरू राहिल्यानंतर आता या प्रकाराचा निषेध म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना २५ हजार पत्र आणि १० हजार मेल पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. या संदर्भात `सरकारनामा`शी बोलतांना आमदार अतुल सावे म्हणाले, रामाची पुजा केली म्हणून सरकारने आमच्यावर गुन्हे दाखल केले. याबद्दल भाजप कार्यकर्त्यांच्या मनामध्ये प्रचंड चीड आहे. आम्हीही रामाचे पुजन केले मग आमच्यावरही गुन्हे दाखल करा, असा संताप त्यांच्याकडून व्यक्त होत आहे. हा संताप मु्ख्यमंत्र्यांपर्यत पोहचवण्यासाठीच आजपासून पत्र आणि मेल पाठवण्याच्या मोहिमेला सुरूवात करण्यात आली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com