मराठवाडा पदवीधरसाठी भाजपकडून शिरीष बोराळकर यांना उमेदवारी.. - BJP nominates Shirish Boralkar for Marathwada graduate | Politics Marathi News - Sarkarnama

मराठवाडा पदवीधरसाठी भाजपकडून शिरीष बोराळकर यांना उमेदवारी..

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 9 नोव्हेंबर 2020

भाजपकडून बोराळकर यांच्यासह घुगे, शितोळे, माजी केंद्रीय राज्यमंत्री जयसिंगराव गायकवाड यांनी देखील उमेदवारीसाठी प्रयत्न केले होते. परंतु बोराळकर यांनी या सर्वांवर मात करत उमेदवारी मिळवली. फडणवीस यांचे समर्थक म्हणून बोराळकर ओळखले जातात. २०१४ मध्ये बोराळकर यांनी पदवीधरची निवडणूक लढवली होती.

औरंगाबाद ः मराठवाडा पदवीधर निवडणुकीसाठी अपेक्षेप्रमाणे भाजपने शिरीष बोराळकर यांना उमेदवारी दिली आहे. आज सकाळी दिल्लीतून त्यांच्या नावावर शिक्कमोर्तब झाले. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोराळकर यांच्या नावाचा आग्रह पक्षश्रेष्ठीकडे धरला होता, त्यामुळे प्रवीण घुगे यांचे नाव मागे पडले. आता महाविकास आघाडीकडून सतीश चव्हाण यांच्या नावाची अधिकृत घोषणा कधी होते? याकडे सगळ्याचे लक्ष लागले आहे. भाजप विरुध्द महाविकास आघाडी असा थेट सामना यावेळी रंगणार आहे,

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे मराठवाडा पदवीधर निवडणुकीच्या निमित्ताने दोन दिवसांपासून औरंगाबादेत आले आहेत. महापालिका व पदवीधर निवडणुकीच्या तयारीचा आढावा त्यांनी घेतला. भाजप उमेदवाराची घोषणा काल पाटील करतील असे बोलले जात होते. मात्र बोराळकर की घुगे यावर अंतीम निर्णय दिल्लीत होणार असल्याने कालचा मुहूर्त टळला. अखेर आज सकाळी शिरीष बोराळकर यांच्या नावाची अधिकृत घोषणा करण्यात आली.

भाजपकडून बोराळकर यांच्यासह घुगे, शितोळे, माजी केंद्रीय राज्यमंत्री जयसिंगराव गायकवाड यांनी देखील उमेदवारीसाठी प्रयत्न केले होते. परंतु बोराळकर यांनी या सर्वांवर मात करत उमेदवारी मिळवली. फडणवीस यांचे समर्थक म्हणून बोराळकर ओळखले जातात. २०१४ मध्ये बोराळकर यांनी पदवीधरची निवडणूक लढवली होती. पण तेव्हा राष्ट्रवादीचे सतीश चव्हाण यांनी त्यांचा पराभव केला होता. आता पु्न्हा या दोघांमध्ये लढत होणार आहे.

पदवीधर मतदारांच्या नोंदणीत भाजपने देखील चांगलीच आघाडी घेतली आहे. चंद्रकांत पाटील यांनी कालच्या आढावा बैठकीत भाजपच्या पदाधिकाऱ्यांना हा मतदारसंघ पून्हा भाजपकडे खेचून आणण्यासाठी शक्तीपणाला लावण्याचे आवाहन केले होते. उमेदवारी जाहीर झाल्यामुळे आता भाजपचे पदाधिकारी जोमाने कामाला लागले आहेत.

Edited By : Jagdish Pansare

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख