भाजप आमदार नारायण कुचे यांना कोरोनाची लागण... - BJP MLA Kuche infected with corona | Politics Marathi News - Sarkarnama

भाजप आमदार नारायण कुचे यांना कोरोनाची लागण...

लक्ष्मण सोळुंके
बुधवार, 4 नोव्हेंबर 2020

नुकताच त्यांना त्रास आणि लक्षणे जाणवायला लागली. तेव्हा त्यांनी कोरोना चाचणी करून घेतली. अहवाल पाॅझीटीव्ह आल्याने त्यांना तातडीने उपचारासाठी औरंगाबाद येथील खाजगी रुग्णालयात भरती करण्यात आले. नारायण कुचे यांची प्रकृती स्थिर असल्याचे डाॅक्टरांनी सांगितले आहे.

जालना ः बदनापूरचे भाजप आमदार नारायण कुचे यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. अहवाल पाॅझीटीव्ह आल्याने त्यांना औरंगाबादेत खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. आपल्या संपर्कात आलेल्या सर्वांनी कोरोनाची चाचणी करून घ्यावी, असे आवाहन देखील कुचे यांनी केले आहे.

कोरोना संकट काळात राजकीय नेते, लोकप्रतिनिधी पुढाऱ्यांना संसर्ग झाल्याचे दिसून आले होते. अगदी महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री ते आमदार, खासदार या सगळ्यांनाच कोरोनाने आपल्या कव्हेत घेतले. अनेकांनी कोरोनावर मात करत नव्याने आपल्या कामाला सुरूवात केली, तर अजूनही नेते, लोकप्रतिनिंधींना संसर्ग होण्याचे प्रमाण सुरूच आहे.

भाजप आमदार नारायण कुचे यांनी मध्यंतरीच्या काळात लोकांना अन्नधान्य, दैनंदिन वस्तूंचे वाटप केले. त्यानंतर पक्ष, संघटनेच्या बैठका, आंदोलनात देखील ते सहभागी झाले होते. कोरोना प्रादुर्भाव वाढलेला असतांना योग्य काळजी घेत त्यांनी आपला बचाव केला होता. पण नुकताच त्यांना त्रास आणि लक्षणे जाणवायला लागली. तेव्हा त्यांनी कोरोना चाचणी करून घेतली. अहवाल पाॅझीटीव्ह आल्याने त्यांना तातडीने उपचारासाठी औरंगाबाद येथील खाजगी रुग्णालयात भरती करण्यात आले.

 नारायण कुचे यांची प्रकृती स्थिर असल्याचे डाॅक्टरांनी सांगितले आहे. कुचे  यांच्या उपस्थीतीत आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते अंबड येथील डेडीकेटेड कोवीड-19 हेल्थ सेंटरचे रविवारी उद्घाटन करण्यात आले होते. त्यामुळे दरम्यानच्या काळात जे कुणी आपल्या संपर्कात आले असतील, त्यांनी आपली कोरोना चाचणी करून घ्यावी व काळजी घ्यावी, असे आवाहन देखील कुचे यांनी केले आहे.

Edited By : Jagdish Pansare

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख