बिहारमध्ये शिवसेनेला मानणारा मोठा वर्ग, यश निश्चित मिळेल...

यापुर्वीच्या निवडणुकीत अनेक मतदारसंघात शिवसेनेच्या उमेदवारांनी तीस-चाळीस हजारांवर मते मिळवली होती. मागच्या निवडणुकीत ज्या १६ मतदारसंघांची माझ्यावर जबाबदारी होती, तिथे देखील शिवसेनेच्या उमेदवारांनी लक्षवेधी मते घेतली होती.
Sena leader chandrakant khaire satar campainer at bihar election news
Sena leader chandrakant khaire satar campainer at bihar election news

औरंगाबाद ः बिहार राज्यात शिवसेनेने यापुर्वीही विधानसभा निवडणुक लढवली आहे. मी स्वतः सोळा मतदारसंघात प्रचारासाठी फिरलो होतो. तिथे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेनेला मानणारा मोठा वर्ग आहे. त्यामुळे शिवसेनेच्या उमेदवारांनी लक्षवेधी मते घेतली होती.आता देखील शिवसेनेच्या मतांमध्ये मोठी वाढ होऊन पक्षाला यश मिळण्याची खात्री असल्याचे शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी `सरकारनामा`शी बोलतांना सांगितले.

बिहार विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरून पुन्हा नशिब आजमावण्याचा प्रयत्न शिवसेनेकडून केला जाणार आहे. पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी विधानसभा निवडणूक लढवण्याची घोषणा नुकतीच केली होती. त्यानंतर या निवडणूक प्रचाराची जबाबदारी उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्यासह शिवसेनेच्या वीसहून अधिक नेत्यांवर सोपवण्यात आली आहे. बिहार निवडणुकीतील प्रचारात सहभाग घेणाऱ्या नेत्यांची यादी नुकतीच निवडणूक आयोगाकडे पाठवण्यात आली आहे. यात औरंगाबादचे माजी खासदार शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांचा देखील समावेश आहे.

बिहार निवडणुकीची तयारी आणि प्रचाराचे नियाेजन या संदर्भात विचारले असता खैरे म्हणाले, बिहारमध्ये शिवसेना पन्नास निवडक मतदारसंघामध्ये उमेदवार देणार आहे. या मतदारसंघामध्ये शिवसेनेला मानणारा मोठा वर्ग आहे. यापुर्वीच्या निवडणुकीत अनेक मतदारसंघात शिवसेनेच्या उमेदवारांनी तीस-चाळीस हजारांवर मते मिळवली होती. मागच्या निवडणुकीत ज्या १६ मतदारसंघांची माझ्यावर जबाबदारी होती, तिथे देखील शिवसेनेच्या उमेदवारांनी लक्षवेधी मते घेतली होती.

निवडणूक लढवण्याची घोषणा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केल्यानंतर आता निवडणुक प्रचार, कुणाला कोणत्या मतदारसंघाची जबाबदारी द्यायची या संदर्भात लवकरच शिवसेना भवनात बैठक होऊन निर्णय घेतले जातील. आज शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्या सोबत माझी चर्चा झाली, उद्या सचिव अनिल देसाई यांची भेट घेऊन मी चर्चा करणार आहे. लवकरच बिहार निवडणूक प्रचाराची आखणी होऊन जबाबदाऱ्या निश्चित केल्या जातील.

माझ्यावर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ज्या मतदारसंघांची जबाबदारी सोपवतील तिथे मी जोरदार प्रचार करून शिवसेनेला यश मिळवण्यासाठी शक्तीपणाला लावणार आहे. बिहारमध्ये प्रचारासाठी शहरातील काही पदाधिकारी, कार्यकर्त्यांना देखील नेणार असल्याचे खैरे यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com