मराठवाडा पदवीधरमधील भाजपच्या विजयात बीड जिल्हा महत्वाची भूमिका बजावेल..

येणाऱ्या काळात पदवीधर आमदार म्हणून शिरीष बोराळकर निवडून येणारच आहेत, पण विशेषम्हणजे बीड जिल्ह्यातूनच त्यांना सर्वाधिक पहिल्या पसंतीची मते मिळवून देत त्यांच्या विजयात महत्वाचा वाटा या जिल्ह्याचा असेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
Mp Pritam Munde rally in beed news
Mp Pritam Munde rally in beed news

औरंगाबाद : मराठवाडा पदवीधर हा भाजपचा हक्काचा मतदारसंघ यावेळी कुठल्याही परिस्थितीत खेचून आणणार, आणि शिरीष बोराळकर आमदार होणार, असा विश्वास खासदार प्रीतम मुंडे यांनी व्यक्त केला. बोराळकरांच्या या विजयात बीड जिल्ह्याचे मोठे योगदान असेल, याच जिल्ह्यातून त्यांना आम्ही मताधिक्य मिळवून देऊ, अशी ग्वाही देखील प्रीतम मुंडे यांनी यावेळी दिली.

भारतीय जनता पक्ष महायुतीचे अधिक्रुत उमेदवार शिरीष बोराळकर यांच्या प्रचारार्थ कडा येथील आनंदराव धोंडे, बाबाजी महाविद्यालयात शिक्षक, शिक्षण क्षेत्रातील विविध कर्मचारी, पदवीधरांचा मेळावा घेण्यात आला. यावेळी प्रतिम मुंडे यांनी उपस्थितांना आवाहन करतांनाच येणाऱ्या काळात पदवीधर आमदार म्हणून शिरीष बोराळकर निवडून येणारच आहेत,  पण विशेष म्हणजे बीड जिल्ह्यातूनच त्यांना सर्वाधिक पहिल्या पसंतीची मते मिळवून देत त्यांच्या विजयात महत्वाचा वाटा या जिल्ह्याचा असेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

तिसऱ्यांदा निवडूण येऊ आणि हॅट्रीक साधू हे स्वप्न पाहणाऱ्या विरोधी पक्षाच्या उमेदवाराचे यावेळी डिपाॅझीट जप्त होईल, अशी परिस्थीती असल्याचेही प्रीतम मुंडे म्हणाल्या. गेल्या बारा वर्षोत पदवीधर व शिक्षक मतदार संघ दोन्ही ही यांच्याकडे असताना देखील शिक्षण क्षेत्रातील संस्था चालक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांचे प्रश्न प्रलंबित आहेत.

या आमदारांना निवडणूक आली तेव्हाच शिक्षक आठवतात. तेही त्यांचा प्रचार करण्यासाठी व निवडणूक संपल्यानंतर हे प्रश्न सोडवणे तर दुर  बोलायला देखील यांच्याकडे वेळ नसतो. यावेळी मात्र कडा, आष्टी, बीडसह संपूर्ण मराठवाड्यातील शिक्षण क्षेत्रातील व्यक्तींनी ठरवले आहे की, ह्या समस्या सोडवण्यासाठी येणाऱ्या पदवीधर निवडणुकीत शिरिष बोराळकरांना पहिल्या पसंतीचे मतदान करून फक्त विजयीच नव्हे तर बहुमताने विजयी करणार, असेही प्रीतम मुंडे म्हणाल्या.

बारा वर्षात शिक्षण क्षेत्राची पिछेहाट झाली..

माजी आमदार भिमराव धोंडे यांनी देखील विरोधी उमेदवारावर टिकास्त्र सोडले.   विद्यमान आमदारांनी निवडून आल्यावर शिक्षण क्षेत्रातील प्रश्न सोडवण्या ऐवजी स्वतःच्या शिक्षण संस्थाच मोठ्या केल्या. यामुळेच गेल्या बारा वर्षात शिक्षण क्षेत्राची पिछेहाट झाली. शिक्षकांच्या पगाराचा गंभीर प्रश्न निर्माण झाला. पेन्शन योजना रखडली. त्यामुळे मतदार त्यांना या निवडणूकीत धडा शिकवल्या शिवाय राहणार नाहीत,असेही धोेंडे यांनी सांगितले..

यावेळी बोराळकर म्हणाले, माझी एकही शिक्षण संस्था नाही. शिक्षण संस्था या युवकांचे उज्वल भविष्य घडवण्यासाठीचे माध्यम आहे. यावरच देशाचे भवितव्य अवलंबून असते. शिक्षण संस्था मधून राष्ट्रीय खेळाडू, आयपीएस अधीकारी, डॉक्टर, वकील, इंजीनियर, उद्योजक, संशोधक तयार झाले पाहिजे. यासाठी मी प्रामाणिक प्रयत्न करीन, अशा शब्द तुम्हाला देतो. मेळाव्याला भिमराव धोंडे, जिल्हा परिषद सदस्य , पंचायत समिती सदस्य, ग्रामपचायत सदस्य , तालुका अध्यक्ष , बूथ प्रमुख व मोठ्या संख्येने पदवीधर मतदार उपस्थित होेते.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com