कोरोना रोखण्यासाठी राबवलेला औरंगाबाद पॅटर्न’ आता देशभरात

औरंगाबाद महापालिकेचा हा फॉर्म्युला केंद्र सरकारने स्वीकारला आहे. केंद्र सरकारच्या आरोग्य मंत्रालयाचे सचिव राजेश भूषण यांनी राज्य सरकार आणि केंद्रशासित प्रदेशाच्या प्रमुखांना त्यांच्या क्षेत्रातील व्यापारी व विक्रेत्यांची कोरोना चाचणी करून घेण्याबद्दल कळवले आहे. औरंगाबाद महापालिकेची संकल्पना आता देशपातळीवर राबविली जाणार असल्यामुळे अधिकाऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
corona aurangabad partern news
corona aurangabad partern news

औरंगाबाद ः महापालिकेने जुलै महिन्यात शहरातील व्यापारी व विक्रेत्यांच्या चाचण्या करण्याचा निर्णय घेतला. सुरवातीला विरोध झाल्यानंतर सगळ्यांनाच याचे महत्व पटले. मोठ्या प्रमाणात व्यापारी व विक्रेत्यांमध्ये पॉझीटीव्ह रुग्ण आढळले आणि प्रशासनाने त्यांना विलगीकरण करत काही प्रमाणात कोरोनाचा प्रादुर्भाव कामी केला. चाचण्यांमुळे बाधित रुग्णांची संख्या वाढली असली तरी त्याचा संसर्ग कमी करण्यात यश आले. आता हाच व्यापारी आणि विक्रेत्यांची चाचणी करण्याचा ‘औरंगाबाद पॅटर्न' देशभरात राबवण्यात येणार आहे. राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांनी व्यापारी व विक्रेत्यांची कोरोना चाचणी करावी, असे निर्देश केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सचिव राजेश भूषण यांनी दिले आहेत. 

शहर व जिल्ह्यात वाढणारा कोरोनाचा प्रादुर्भाव आणि साखळी रोखण्यासाठी महापालिका व जिल्हा प्रशासनाने भरपूर प्रयत्न केले. लॉकडाऊन, कडक लॉकडाऊनचे प्रयोग झाले, पण शिशिलता मिळताच पुन्हा कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत गेली. मृतांचेही प्रमाण वाढल्याने प्रशासन हतबल झाले होते. त्यानंतर १० ते १८ जुलैदरम्यान प्रशासनाने कठोर लॉकडाउनची अंमलबजावणी केली.

प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी शहरातील व्यापारी व विक्रेत्यांची अँटीजेन चाचणी करण्याचा निर्णय घेतला. जे व्यापारी चाचण्या न करता आस्थापना उघडतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असा इशारा देण्यात आल्याने सुरवातीला व्यापाऱ्यांनी विरोध केला. त्यानंतर ठराविक वेळ देण्यात आल्याने व्यापाऱ्यांचा विरोध मावळला.

दरम्यान, मोठ्या संख्येने चाचण्या करण्यात आल्याने त्याचे परिणामदेखील दिसून आले. सध्या औरंगाबाद शहरातील कोरोनाची स्थिती नियंत्रणात येत असल्याचे चित्र आहे. औरंगाबाद महापालिकेचा हा फॉर्म्युला केंद्र सरकारने स्वीकारला आहे. केंद्र सरकारच्या आरोग्य मंत्रालयाचे सचिव राजेश भूषण यांनी राज्य सरकार आणि केंद्रशासित प्रदेशाच्या प्रमुखांना त्यांच्या क्षेत्रातील व्यापारी व विक्रेत्यांची कोरोना चाचणी करून घेण्याबद्दल कळवले आहे. औरंगाबाद महापालिकेची संकल्पना आता देशपातळीवर राबविली जाणार असल्यामुळे अधिकाऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. 

कोरोना संसर्ग रोखण्यासाठी महापालिकेने ‘एमएचएमएच’ ॲप तयार केला. त्यात मृत्युदर कमी करण्यासाठी ५० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या नागरिकांचे सर्वेक्षण करण्यात आले. त्याचा फायदा मृत्युदर कमी करण्यासाठी झाला. त्यामुळे अनेक महापालिकांनी विचारणा करून हा ॲप तयार करण्याचा निर्णय घेतला. तसेच एक हजार मोबाईल फिव्हर क्लिनिक, शहराच्या एन्ट्री पॉइंटवर अँटीजेन व आरटीपीसीआर चाचणी अशा महापालिकेच्या विविध उपक्रमांची दखल घेतली गेली. 

Edited By : Jagdish Pansare
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com