आमदार नारायण कुचे-अंबादास दानवे यांच्यात 'चाय पे चर्चा' 

आमदार नारायण कुचे-अंबादास दानवे यांच्यात 'चाय पे चर्चा' 

कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे बाबुराव कुलकर्णी आणि महायुतीचे अंबादास दानवे यांच्यात 19 ऑगस्ट रोजीच्या मतदानात थेट लढत होणार आहे. युतीकडे 333 एवढे संख्याबळ असल्याने दानवे यांचा विजय निश्‍चित समजला जात असला तरी ते कुठलीही जोखीम स्वीकारण्यास तयार नाही. त्यामुळे बहुमत असले तरी महायुतीच्या मतदारांच्या भेटीगाठी घेण्यासाठी ते दोन्ही जिल्ह्यात जात आहेत.

बदनापूर: औरंगाबाद-जालना स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघ निवडणुकीचे मतदान पाच दिवसावर येऊन ठेपले आहे. महायुतीचे उमेदवार अंबादास दानवे यांनी नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य आणि स्थानिक नेते, आमदारांच्या भेटीगाठीवर भर दिला आहे. बदनापूरचे भाजप आमदार नारायण कुचे यांची नुकतीच त्यांच्या निवासस्थानी दानवे यांनी भेट घेतली. यावेळी दोघांमध्ये चहा घेत प्रदीर्घ चर्चा झाली. दानवे-कुचे यांच्यातील 'चाय पे चर्चा' सध्या मतदारसंघात चांगलीच चर्चिली जात आहे. 

कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे बाबुराव कुलकर्णी आणि महायुतीचे अंबादास दानवे यांच्यात 19 ऑगस्ट रोजीच्या मतदानात थेट लढत होणार आहे. युतीकडे 333 एवढे संख्याबळ असल्याने दानवे यांचा विजय निश्‍चित समजला जात असला तरी ते कुठलीही जोखीम स्वीकारण्यास तयार नाही. त्यामुळे बहुमत असले तरी महायुतीच्या मतदारांच्या भेटीगाठी घेण्यासाठी ते दोन्ही जिल्ह्यात जात आहेत. 

बदनापूरचे आमदार नारायण कूचे यांची मंगळवारी त्यांनी घरी जाऊन भेट घेतली. नारायण कुचे मुळचे औरंगाबादचे असल्यामुळे आणि महापालिकेत ते नगरसेवक आणि स्थायी समितीचे सभापती राहिल्यामुळे त्यांचे आणि अंबादास दानवे यांचे संबंध चांगले आहेत. बदनापूर नगरपालिका भाजपच्या ताब्यात असून कुचे यांचा शब्द येथील नगरसेवकांसाठी प्रमाण मानला जातो. या पार्श्‍वभूमीवर अंबादास दानवे यांनी कुचे यांच्याशी चर्चा केली. 

या संदर्भात 'सरकारनामा'शी बोलतांना, नारायण कुचे म्हणाले, "अंबादास दानवे आमचे नेते आहेत, त्यांचा विजय निश्‍चित असून दोन्ही जिल्ह्यातून त्यांना चांगला प्रतिसाद मिळत आहे. देशातील जनतेने लोकसभा निवडणुकीत भाजप-सेना युतीवर विश्वास व्यक्त केला. तसाच विश्वास या निवडणुकीत मतदार सदस्य व्यक्त करतील."

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com