Mp,Mla Hingoli Celebrate
Mp,Mla Hingoli CelebrateSarkarnama

युपीएससीत यश मिळवणाऱ्या बांगरचे कौतुक; खासदार-आमदारांनी खांद्यावर उचलून घेतले

(Upsc Exam Result) हिंगोलीच्या वैभव सुभाष बांगरने (Vaibhav Bangar Sucsess) पहिल्याच प्रयत्नात यशाला गवसणी घातली.

हिंगोली : युपीएससी परीक्षेत यश मिळवत जिल्ह्याचे नाव मोठे केल्याच्या आनंद शिवसेनेचे खासदार हेमंत पाटील व आमदार संतोष बांगर यांनी वैभवला चक्क खाद्यांवर उचलून घेतले. वैभवच्या यशामुळे संपुर्ण जिल्ह्यात आनदांचे वातावरण असतांना लोकप्रतिनिधींनीही त्याचे कौतुक केले. आमदार-खासदारांनी त्याला खांद्यावर उचलून घेत त्यांची मिरवणूकही काढली.

युपीएससी परीक्षेचा नुकताच निकाल जाहीर झाला. या परिक्षेत मराठवाड्यातील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवले. मराठवाड्यावर मागसलेपणाचा लागलेला शिक्का या निमित्ताने पुसला जात आहे. लातूर, बीड, औरंगाबाद, हिंगोलीसह मराठवाड्यातून परीक्षा दिलेल्या अनेक विद्यार्थ्यांनी युपीएससी परीक्षेत यश संपादन केले आहे.

यात हिंगोलीच्या वैभव सुभाष बांगर यांचा देखील समावेश आहे. पहिल्याच प्रयत्नात वैभवने यशाला गवसणी घातली. त्याच्या या यशाबद्दल जिल्ह्यात सर्वत्र कौतुक होत असून ठिकठिकाणी वैभवचा सत्कार देखील होत आहे.

रविवारी खासदार हेमंत पाटील व आमदार संतोष बांगर यांनी देखील वैभवचे कौतुक केले. एवढेच नाही तर त्याला या दोघांनी खांद्यावर उचलून घेत त्याची मिरवणूक देखील काढली. वैभव बांगर हे हिंगोली शिवसेना जिल्हा प्रमुख तथा आमदार संतोष बांगर यांचे बंधू नगर परिषद सदस्य सुभाष बांगर यांचे चिरंजीव आहेत.

हिंगोली येथे शिवसेना मध्यवर्ती कार्यालयाच्या प्रांगणात झालेल्या कार्यक्रमात या दोन्ही लोकप्रतिनिधींनी वैभवचा सत्कार केला.

Mp,Mla Hingoli Celebrate
भरती प्रक्रियेची जबाबदारी पुन्हा न्यासाला, टोपे म्हणतात आमचा संबंध नाही..

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com