औरंगाबादच्या जिल्हाधिकारी पदी सुनील चव्हाण यांची नियुक्ती

सुनील चव्हाण हे २००७ च्या बॅचचे आयएएस अधिकारी होते. रत्नागिरी येथे जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत असतांना मार्च २०१९ मध्ये त्यांची औरंगाबाद येथे महावितरणचे सह व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. मराठवाडा कृषी विद्यापीठातून चव्हाण यांनी एमएससी ॲग्रीकल्चर, ॲग्रॉनॉमी ॲन्ड क्रॉप सायन्सची पदवी मिळवलेली आहे, या शिवाय ते एमडी ॲग्रीकल्चर देखील आहेत.
sunil chavan as collector in aurangabad news
sunil chavan as collector in aurangabad news

औरंगाबाद ः जिल्हाधिकारी पदी अखेर सुनील चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली आहे. चव्हाण हे सध्या औरंगाबाद येथे महावितरणचे सह व्यवस्थापकीय संचालक म्हणून कार्यरत आहेत. उदय चौधरी यांची मुंबईला मंत्रालयात उपसचिव पदी नियुक्ती झाल्यानंतर औरंगाबादला जिल्हाधिकारी म्हणून कोण येणार याची उत्सूकता होती. अपेक्षे प्रमाणे सुनील चव्हाण यांच्या नियुक्तीचे आदेश शासनाकडून आले असून चव्हाण आजच पदभार स्वीकारणार असल्याचे समजते.

एप्रिल २०१८ मध्ये जेव्हा औरंगाबादेत जिल्हाधिकारी म्हणून उदय चौधरी यांची नियुक्ती झाली होती. तेव्हाच सुनील चव्हाण यांच्या नावाची चर्चा होती. १३ एप्रिल रोजी तसे आदेशही निघाले होते. परंतु तेव्हा चव्हाण यांच्या बदलीचे आदेश चारच दिवसांत म्हणजे १७ एप्रिल रोजी शासनाकडून रद्द करण्यात आले होते.

सुनील चव्हाण तेव्हा ठाणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त म्हणून कार्यरत होते. आता दोन वर्षांनी सुनील चव्हाण यांना औरंगाबादचे जिल्हाधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. उदय चौधरी यांची नुकतीच मुंबई मंत्रलायातील मुख्य सचिवांच्या कार्यालयात उपसचिव पदी नियुक्ती करण्यात आली होती.

सुनील चव्हाण हे २००७ च्या बॅचचे आयएएस अधिकारी होते. रत्नागिरी येथे जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत असतांना मार्च २०१९ मध्ये त्यांची औरंगाबाद येथे महावितरणचे सह व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. मराठवाडा कृषी विद्यापीठातून चव्हाण यांनी एमएससी ॲग्रीकल्चर, ॲग्रॉनॉमी ॲन्ड क्रॉप सायन्सची पदवी मिळवलेली आहे, या शिवाय ते एमडी ॲग्रीकल्चर देखील आहेत. 

मराठवाडयाचे भूमीपुत्र असलेले सुनील चव्हाण यांनी मंत्रालयात उपसचिव म्हणून जबाबदारी सांभाळलेली आहे. ठाणे महानगर पाालिकेत अतिरिक्त आयुक्त म्हणून साडे तिन वर्ष त्यांनी काम पाहिले आहे. यावेळी ठाणे महापालिकेत स्मार्ट सिटी मुख्य कार्यकारी अधिकारी व अतिरिक्त आयुक्त म्हणून काम करतांना साडेपाच हजार कोटी रूपयांचा अर्थसंकल्पाचा मसुदा तयार करत त्यांनी दीडशे पेक्षा जास्त योजना राबविल्या होत्या.

तसेच अतिरिक्त आयुक्त म्हणून १८ हजार पेक्षा जास्त बेकादेशीर व अवैध बांधकामांवर कार्यवाही केली होती. त्यांच्या या कारवाईमुळे  सुमारे पंचवीसशे कोटी किमंतीची ७५ हेक्टर नागरी जमीन नागरी सुविधांसाठी उपलब्ध झाली. रत्नागिरी येथे जिल्हाधिकारी म्हणून काम करत असतांना  तिवरे ता. चिपळून धरण फुटीच्या दुर्घटनेमध्ये आपतीग्रस्तांना मदत करण्यात चव्हाण यांनी खनिय काम केले होते. रत्नागिरी जिल्ह्यात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार योजने अंतर्गत दहा हजार क्टर क्षेत्रावर आंबा व काजु फळबाग लागवडीसाठीही त्यांनी पुढाकार घेतला होता.


 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com