'डीवायएसपी'ने मागितली दोन कोटींची लाच अन् अडकला 'लाचलुचपत'च्या जाळ्यात

गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देऊन दोन कोटी रुपयांची मागणी करून त्यातील दहा लाखांची लाच घेतल्याप्रकरणीउपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र पाल यांच्यासह कर्मचाऱ्याला अटक झाली आहे.
'डीवायएसपी'ने मागितली दोन कोटींची लाच अन् अडकला 'लाचलुचपत'च्या जाळ्यात
acb arrested selu dysp rajendra pal for accepting bribe

सेलू : गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देऊन दोन कोटी रुपयांची मागणी करून त्यातील दहा लाखांची लाच घेताना सेलू येथील उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या अंतर्गत काम करणारा पोलीस कर्मचारी गणेश लक्ष्मणराव चव्हाण आज पहाटे पकडण्यात आले. याप्रकरणी उपविभागीय पोलीस अधिकारी (DySP) राजेंद्र पाल (Rajendra Pal) यांच्यासह चव्हाणला अटक झाली आहे. त्यांच्यावर सेलू पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (ACB) पथकाने ही कारवाई केली.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सेलू पोलीस ठाण्यांतर्गत ३ मे रोजी एका अपघात प्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्यातील मृताच्या पत्नीसोबत एका व्यक्तीची मोबाईलवरील संभाषणाची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. सेलू येथील उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र पाल यांनी त्याला 9 जुलैला कार्यालयात बोलावून घेतले होते. 'तुझी ऑडिओ क्लिप मी ऐकली असून, यातून बाहेर पडायचे असेल तर तू मला दोन कोटी रुपये दे,' असे पाल यांनी धमकावले. नंतर पाल यांनी त्याला कार्यालयात वारंवार बोलावून व फोन करून अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केली.

संबंधित व्यक्तीने याची तक्रार मुंबईतील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयात २२ जुलैला केली. या तक्रारीनुसार विभागाच्या अधिकाऱ्यांनी 23 जुलैला तक्रारीची खातरजमा केली. त्यात उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र पाल यांनी तक्रारदाराकडे गुन्ह्यात मदत करण्यासाठी दोन कोटी रुपयांची मागणी केल्याचे समोर आले. नंतर त्यांची 1 कोटी 50 लाख रुपयांवर तडजोड झाल्याचेही समोर आले. 

त्यानंतर काही वेळातच तक्रारदाराच्या भावाकडून राजेंद्र पाल यांच्या कार्यालयाशी संलग्न मानवत पोलिस ठाण्यातील पोलीस कर्मचारी गणेश लक्ष्मणराव चव्हाण यांना दहा लाख रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी पकडले. याप्रकरणी सेलू येथील पोलीस ठाण्यात उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र पाल व पोलीस कर्मचारी गणेश चव्हाण यांच्या विरोधात दाखल करण्यात आला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in