सत्तारांच्या संस्थेतील 12 शिक्षक अडचणीत येणार ; दानवेंचा आरोप

Abdul Sattar : अब्दुल सत्तार यांच्या दोन मुलींची नावे यापूर्वीच टीईटी घोटाळा प्रकरणात समोर आली होती.
Minister Abdul Sattar-Opposition Leader Ambadas Danve News
Minister Abdul Sattar-Opposition Leader Ambadas Danve NewsSarkarnama

औरंगाबाद : राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांचे (Abdul Sattar) टीईटी घोटाळा (TET Scam) प्रकरणात नाव आले होते. आता सत्तार यांच्या अडचणीत आणखी वाढ होताना दिसून येत आहे. अब्दुल सत्तार यांच्या शिक्षण संस्थेतील आणखी बारा शिक्षकांकडे टीईटीचे बोगस प्रमाणपत्र असल्याचा आरोप विधानपरिषदेतील विरोधीपक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी केला आहे. (Latest Marathi News)

Minister Abdul Sattar-Opposition Leader Ambadas Danve News
शशी थरूर काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक लढवणार ? महाराष्ट्रातील नेत्याचे नाव ही चर्चेत

अब्दुल सत्तार यांच्या दोन मुलींची नावे यापूर्वीच टीईटी घोटाळा प्रकरणात समोर आली होती. मात्र तेव्हा सत्तार यांनी सर्व आरोप धादांत खोटे आहेत असे म्हणून, सर्व आरोप आरोप फेटाळून लावले होते. टीईटी घोटाळ्यात सत्तार यांच्या मुलींचीं नावे, मंत्रीमंडळ विस्तारापूर्वी समोर आली होती. त्यामुळे सत्तार यांना मंत्रिपद मिळणार का? याबाबत संदिग्धता होती. मात्र त्यांच्यावर आरोप होऊनही, मंत्रिमंडळ विस्तारात सत्तार यांना स्थान देण्यात आले. आता अंबादास दानवे यांनी पुन्हा एकदा त्यांच्यावर आरोप केल्याने, हे प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.

Minister Abdul Sattar-Opposition Leader Ambadas Danve News
अण्णा हजारे केजरीवालांना म्हणाले, तुम्ही सत्तेच्या नशेत बुडाला आहात

दानवे यांनी सत्तार यांच्यांवर गंभीर आरोप केला आहे. नॅशनल एज्युकेशन सोसायटी ही सत्तारांची शिक्षणसंस्था आहे. या संस्थेत कार्यरत असलेल्या आणखी बारा शिक्षकांकडे टीईटीचे बोगस प्रमाणपत्र असल्याचा आरोप, दानवे यांनी केला आहे. यापूर्वीच या प्रकरणात अब्दुल सत्तार यांच्या दोन मुलींची नावे समोर आली होती. मात्र सत्तार यांनी आरोप फेटाळून लावले होते. मात्र या प्रकरणावर बोलताना, माझ्याकडे अब्दुल सत्तार यांच्या मुलींच्या पगाराची कागदपत्रं असल्याचा दावा देखील अंबादास दानवे यांनी केला आहे. या प्रकरणात चौकशी झाली पाहिजे, असे देखील, दानवे यांनी म्हटलं आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in