आजचा वाढदिवस ः धनंजय मुंडे, जिल्हा परिषद सदस्य ते राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री - todays birthday dhananjay munde zp member to minister for social justice | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोल्हापुरात दाखल..पुरग्रस्त भागाची पाहणी
पुणेकरांना खुशखबर : पुणे मेट्रोची शुक्रवारी सकाळी ७ वाजता ट्रायल रन...पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत कोथरुड डेपो ते आयडीयल कॉलनीदरम्यान ट्रायल

आजचा वाढदिवस ः धनंजय मुंडे, जिल्हा परिषद सदस्य ते राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री

जगदीश पानसरे
गुरुवार, 15 जुलै 2021

त्यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा परिषद, परळी नगर परिषद, परळी बाजार समिती अशा विविध संस्थांवर राष्ट्रवादीचे वर्चस्व आहे. संत नागा जगमित्र सहकारी सूतगिरणीचे ते संस्थापक आहेत. त्यांनी साखर कारखान्याची उभारणीही सुरू केली आहे.

औरंगाबाद ः धनंजय मुंडे यांची राजकीय सुरुवात जिल्हा परिषद सदस्यपदापासून झाली. बीड जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम केले. भाजपमध्ये असताना भारतीय जनता युवा मोर्चाचे ते प्रदेशाध्यक्ष होते.

त्यानंतर त्यांना विधान परिषदेवरही भाजपकडून संधी दिली गेली. राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेशानंतर राष्ट्रवादीने पुन्हा त्यांची विधान परिषदेवर निवड करून विधान परिषदेचे विरोधी पक्षनेतेपद त्यांना दिले. उत्तम संघटक, आक्रमक वक्तृत्व आणि समाजातील तळागाळातील घटकांच्या प्रश्नांची जाण असलेले नेते अशी त्यांची ओळख आहे. 

दरम्यान, परळी मतदार संघातून त्यांनी भाजप नेत्या व तत्कालीन मंत्री पंकजा मुंडे यांचा मोठ्या फरकाने पराभव केला. पक्षाने त्यांना राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य या महत्वाच्या खात्यांच्या मंत्रिपदासह बीड जिल्ह्याचे पालकमंत्रिपद दिले. त्यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा परिषद, परळी नगर परिषद, परळी बाजार समिती अशा विविध संस्थांवर राष्ट्रवादीचे वर्चस्व आहे. संत नागा जगमित्र सहकारी सूतगिरणीचे ते संस्थापक आहेत. त्यांनी साखर कारखान्याची उभारणीही सुरू केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जिल्हा संघटनेवरही त्यांचेच वर्चस्व आहे.

हेही वाचा : विदर्भात शिवसेनेला भगदाड, आणखी एक नेता शिवबंधन तोडण्याच्या मार्गावर ?
Edited By : Atul Mehere

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख