Parbhani MP Sanjay Jadhav Birthday | Sarkarnama

आजचा वाढदिवस : संजय जाधव, खासदार , परभणी लोकसभा मतदार संघ

गणेश पांडे 
सोमवार, 1 जून 2020

परभणी जिल्ह्याचे विद्यमान खासदार संजय जाधव यांचा 1 जून रोजी वाढदिवस आहे. सलग दोन वेळा परभणी विधानसभा मतदार संघाचे आमदार व सलग दोन वेळा परभणी लोकसभा मतदार संघाचे खासदार आहेत

रभणी जिल्ह्याचे विद्यमान खासदार संजय जाधव यांचा 1 जून रोजी वाढदिवस आहे. सलग दोन वेळा परभणी विधानसभा मतदार संघाचे आमदार व सलग दोन वेळा परभणी लोकसभा मतदार संघाचे खासदार आहेत. परभणी जिल्ह्यात शिवसेनेच्या स्थापने पासून ते शिवसैनिक म्हणून कार्यरत आहेत. शिवसेनाप्रमुख (कै.) बाळासाहेब ठाकरे यांचे विश्वासू व कट्टर समर्थक म्हणून त्यांची ओळख आहे. 

२०१४ पासून ते आज पर्यंत जिल्ह्यातील महामार्ग, रेल्वे वाहतुकीचे प्रश्न सातत्याने मांडून त्याची सोडवणूक करून घेण्याचे काम त्यांनी केले. पंढरपूरच्या विठ्ठलाचे भक्त, वारकरी संप्रदायात रममाण होणारे, गेल्या २० वर्षांपासून आषाढीची ते पायी वारी करतात.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख