आजचा वाढदिवस : बजरंग सोनवणे (जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस) - Beed NCP District President Bajrang Sonawane Birthday today | Politics Marathi News - Sarkarnama

आजचा वाढदिवस : बजरंग सोनवणे (जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस)

दत्ता देशमुख
सोमवार, 6 जुलै 2020

बजरंग सोनवणे वाढदिवस -(सोमवार, ता. ६ जुलै)

राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष असलेले बजरंग सोनवणे हे बीड जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष आणि शिक्षण व आरोग्य समितीचे सभापती  देखील आहेत. ग्रामपंचायतीचे उपसरंपच पदापासून राजकीय सुरुवात करणारे बजरंग सोनवणे नंतर पंचायत समिती सदस्य, उपसभापती झाले. 

राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष असलेले बजरंग सोनवणे हे बीड जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष आणि शिक्षण व आरोग्य समितीचे सभापती  देखील आहेत. ग्रामपंचायतीचे उपसरंपच पदापासून राजकीय सुरुवात करणारे बजरंग सोनवणे नंतर पंचायत समिती सदस्य, उपसभापती झाले. त्यानंतर ते सलग तीन वेळा जिल्हा परिषदेला विजयी झाले. या खेपेला त्यांच्यासह पत्नी सारिका सोनवणे देखील जिल्हा परिषदेच्या सदस्या आहेत. 

बजरंग सोनवणे अध्यक्ष असलेल्या येडेश्वरी शुगर या खासगी साखर कारखाना गाळपात नेहमी अग्रेसर असतो. त्यांच्या अधिपत्याखाली केज खरेदी विक्री संघ व इतर संस्थाही आहेत. मागच्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारीवर भाजपच्या खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांच्या विरोधात निवडणूक लढविली होती.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख