उद्धव ठाकरे गोपीनाथगडावर येणार; 'ती' रांगोळी राजकीय वाट दाखवेल?

राज्यातील राजकिय कुरघोड्या, निसर्गाच्या दुष्टचक्राने शेतीचे नुकसान आणि यातच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे गोपीनाथगडावर येऊन दर्शन घेत आहेत. ओल्या दुष्काळाच्या पाहणीसाठी येणारे ठाकरे वाट वाकडी करून गडावर येणार असले तरी आज दिवंगत मुंडेंच्या समाधीवर फुलांची काढलेली रांगोळी पाहून यातून काही नवी राजकीय वाट निघेल का अशी चर्चा सुरू झाली आहे.
Rangoli on Gopinath Gadh
Rangoli on Gopinath Gadh

परळी  : राज्यातील राजकिय कुरघोड्या, निसर्गाच्या दुष्टचक्राने शेतीचे नुकसान आणि यातच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे गोपीनाथगडावर येऊन दर्शन घेत आहेत. ओल्या दुष्काळाच्या पाहणीसाठी येणारे ठाकरे वाट वाकडी करून गडावर येणार असले तरी आज दिवंगत मुंडेंच्या समाधीवर फुलांची काढलेली रांगोळी पाहून यातून काही नवी राजकीय वाट निघेल का अशी चर्चा सुरू झाली आहे.

तसे दिवंगत बाळासाहेब ठाकरे व दिवंगत गोपीनाथराव मुंडे यांच्या पक्षाच्या पुढे जाऊन स्नेह होते. आताच्या पिढीत उद्धव ठाकरे आणि पंकजा मुंडे यांच्यात देखील कौटुंबिक संबंध आहेत. मागच्या विधानसभा निवडणुकीत परळीतून पंकजा मुंडे आणि लोकसभा पोटनिवडणुकीत डॉ. प्रीतम मुंडे यांच्या विरोधात शिवसेनेने उमेदवार दिले नव्हते. बहिणीच्या विरोधात उमेदवार नाही अशी थेट भूमिका उद्धव ठाकरे यांनी घेतली होती. 

आता राज्यात शिवसेना - भाजप युतीत तणाव असताना गोपीनाथगडावर उद्धव ठाकरे येत असताना समाधीवर धनुष्यबानावर कमळ असे चित्र दिसणारी फुलातील रांगोळी साकारली आहे. जिल्ह्यात परतीच्या पावसाने झालेल्या पिकांच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी येणारे उद्धव ठाकरे गोपीनाथगडावर जात असल्याने आणि ही रांगोळी व ठाकरे - मुंडे यांचे स्नेह पाहता नवी राजकिय वाट निघणार का हे पाहणे औत्सुक्याचे आहे.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com