मुख्यमंत्र्यांच्या लेखी हमीशिवाय अखेर औरंगाबादमध्ये समांतरचा प्रस्ताव मंजुर

मुख्यमंत्र्यांच्या लेखी हमीशिवाय अखेर औरंगाबादमध्ये समांतरचा प्रस्ताव मंजुर

औरंगाबाद : शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी नेमण्यात आलेल्या समांतर जलवाहिनी योजना पुनरुज्जीवन करण्याचा प्रस्ताव अखेर मुख्यमंत्र्यांच्या लेखी हमी शिवाय महापालिकेत आज (ता.4) मंजुर करण्यात आला. आधीच्या सहा सर्वसाधारण सभेत विविध कारणे देत समांतरचा प्रस्ताव रखडवण्यात आला होता. गेल्या सभेत देखील प्रस्ताव मंजुर करण्याची संपुर्ण तयारी झाली असतांना ऐनवेळी शिवसनेने योजनेसाठी लागणारा अतिरिक्त निधी देण्याची लेखी हमी मुख्यमंत्र्यांनी द्यावी अशी अट घालत प्रस्ताव पुढे ढकलला होता. 

संमातर जलवाहिनी योजना राबवण्यासाठी सिटी वॉंटर युटिलिटी कंपनीसोबतचा करार पुनरूज्जीवीत करण्यासाठी गेल्या आठवड्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्हिडिओ कॉन्फरसिंग द्वारे महापौर, महापालिका आयुक्त यांच्यासह स्थानिक आमदरांशी चर्चा केली होती. या याजनेसाठी येणारा 279 कोटींचा अतिरिक्त खर्च देण्याची तयारी देखील मुख्यमंत्र्यांनी यावेळी दाखवली. 

त्यामुळे समांतरचा प्रस्ताव मंजुर करण्याचा मार्ग मोकळा झाला होता. 27 ऑगस्ट रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेत प्रस्ताव मंजुर होणार हे जवळपास निश्‍चित झाले असतांना ऐनवेळी महापौर नंदकुमार घोडेले यांना निरोपाची चिठ्ठी आली आणि हा प्रस्ताव बारगळला. मुख्यमंत्र्यांनी निधी देण्याबाबत लेखी द्यावे अशी मागणी शिवसेनेकडून करण्यात आल्यामुळे महापालिकेतील सत्ताधाऱ्यांमध्ये चांगलीच जुंपली होती. एकमेकावर आरोप आणि प्रत्यारोप झाल्यामुळे आजच्या सर्वसाधारण सभेत काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. 

मुख्यमंत्र्यांना लेखी हमी मागितल्यामुळे उडालेला गोंधळ आणि झालेली टिका लक्षात घेता शिवसेनेने एक पाऊल मागे घेतल्याचे आज दिसून आले. ज्या लेखी हमीवर शिवसेना अडून बसली होती ती न मिळताच आज समांतरचा प्रस्ताव मंजुर करण्यात आला. महापौरांनी 15 अटी टाकून प्रस्ताव मंजूर केला. त्यामुळे शिवसेना नरमल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली. दरम्यान, कॉंग्रेसने या प्रस्तावाला विरोध करत सभात्याग केला. स्वतःच्या फायद्यासाठी कंपनीला काम देण्यात येत असल्याचा आरोप करत कॉंग्रेसच्या काही सदस्यांनी विषय पत्रिकाही सभागृहात फाडल्या. एकीकडे समांतरच्या प्रस्तावावर महापालिकेत चर्चा सुरु असतांना महापालिका मुख्यालयासमोर मात्र समांतर विरोधी नागरी कृती समितीत व संघर्ष समितीतर्फे आंदोलन व महापालिका विरोधात जोरदार घोषणाबाजी सुरू होती. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com