aurangabad shivsena | Sarkarnama

औंरगाबादमधले शिवसेनेचे एक विभागप्रमुख भाजपमध्ये

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 28 मार्च 2017

औरंगाबाद ः शिवसेनेचे पश्‍चिम विधानसभा मतदारसंघातील आमदार संजय सिरसाट यांचे पीए राहिलेले व सध्या विभागप्रमुख असलेले शिवसेनेचे बाळू गायकवाड आपल्या समर्थकांसह भाजपमध्ये दाखल झाले आहेत. जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये शिवसेनेने कॉंग्रेसशी युती करुन अध्यक्षपद मिळवल्यापासून भाजपमध्ये नाराजीचे वातावरण आहे. शिवसेनेला दणका देण्याच्या तयारीत असलेल्या भाजपने आमदाराच्या पीएलाच पक्षात घेतल्याने शहरात फोडाफोडीच्या राजकारणाची जोरदार चर्चा सुरु झाली आहे. 

शिवसेनेतून बाहेर पडलेल्या व आता भाजपचे जिल्हाध्यक्ष असलेल्या किशनचंद तनवाणी यांनी शहरात शिवसेना कमकुवत करण्याचे प्रयत्न सुरुवातीपासून केले होते. तीन नगरसेवकांना भाजपत घेऊन तनवाणी यांनी शिवसेनेला चांगलाच दणका दिला होता. नुकत्याच झालेल्या नगरपालिका, जिल्हा परिषद निवडणुकीत देखील जिल्ह्यातील ग्रामीण भागात अनेक शिवसैनिकांना भाजपमध्ये प्रवेश केला होता. जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीत शिवसेनेने दगा दिल्याची भावना भाजपमध्ये होती. त्याचा वचपा काढण्यासाठी तनवाणी यांनी आमदार संजय सिरसाट यांच्या पीएलाच भाजपमध्ये आणून शिवसेनेवर कुरघोडी केली आहे. 

एजंट ते ठेकेदार 
शिवसेनेचे विभागप्रमुख असलेले बाळू गायकवाड हे संजय सिरसाट यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जातात. अनेक वर्ष गायकवाड यांनी सिरसाट यांचे स्वीय सहाय्यक म्हणून काम पाहिले आहे. आरटीओ कार्यालयातील एजंट ते सिरसाट यांचे पीए व्हाया ठेकेदार असा त्यांचा प्रवास. कोट्यावधींची कामे सिरसाट यांच्या आर्शिवादानेच गायकवाड यांना मिळाली होती. आमदारांचे सगळे आर्थिक व्यवहार देखील गायकवाडच बघायचे अशी चर्चा त्यावेळी होती. दरम्यान, 2015 मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीत बाळू गायकवाड यांनी बन्सीलालनगर वार्डातून उमेदवारी मागितली होती. पण या वार्डातून आमदार सिरसाट यांचे चिरंजीव सिद्धांत इच्छुक होते. त्यामुळे गायकवाड यांचा पत्ता कट झाला तेव्हापासून ते नाराज होते. सिरसाट यांनी त्यांना पीए पदावरूनही दूर केले होते. भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या उपस्थित गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर गायकवाड यांच्यासह अनेक शिवसैनिक भाजपमध्ये दाखल झाले आहेत. शिवसेनेला हा मोठा धक्का असल्याचे बोलले जाते. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख