ताई, दादा तुमचं पत्र घेऊन आलोय....संजय शिरसाट यांचा अनोखा प्रचार

पश्‍चिम विधानसभा मतदार संघाचे शिवसेना- भाजप महायुतीचे उमेदवार संजय शिरसाट यांचा पदयात्रा, घरोघरी भेटी, व्हाईस मोबाईल कॉलद्वारे संदेश असा प्रचार सुरु असतानाच यात आणखी कल्पकता आणण्याचा प्रयत्न त्यांच्या यंत्रणेने केला आहे. पोस्टमनच्या वेशभुषेतील असंख्य कार्यकर्ते घरोघरी, दुकाने, चौकाचौकात जाऊन पत्राद्वारे प्रचार करत आहेत.
Aurangabad BJP Sena Candidate Campain in Postman's Attire
Aurangabad BJP Sena Candidate Campain in Postman's Attire

औरंगाबाद : पश्‍चिम विधानसभा मतदार संघाचे शिवसेना- भाजप महायुतीचे उमेदवार संजय शिरसाट यांचा पदयात्रा, घरोघरी भेटी, व्हाईस मोबाईल कॉलद्वारे संदेश असा प्रचार सुरु असतानाच यात आणखी कल्पकता आणण्याचा प्रयत्न त्यांच्या यंत्रणेने केला आहे. पोस्टमनच्या वेशभुषेतील असंख्य कार्यकर्ते घरोघरी, दुकाने, चौकाचौकात जाऊन पत्राद्वारे प्रचार करत आहेत.

ताई, दादा तुमचं पत्र घेउन आलोय, हे पत्र म्हणजे जिव्हाळा....अशाच जिव्हाळ्याच्या माणसानं तुमच्यासारख्या जिवाभावाच्या माणसाला पाठवलं महायुतीचे उमेदवार संजय शिरसाट भाऊ यांनी...असे पोस्टमनचे शब्द कानी पडताच ज्यांच्याकडे पोस्टमन जातो ते लोक उत्सुकतेनं त्यांचे म्हणणे ऐकून घेत आहेत.

ऑन ड्युटी चोवीस तास....
"मी तुमचा हक्काचा माणुस संजयभाऊ, तुम्ही दिलेल्या साथीमुळेच मी आजवर सलग 10 वर्ष आमदार आहे. साध्या घरातला साधा माणुस तुमच्यामुळेच पहिल्यांदा नगरसेवक झालो. 10 वर्षे नगरसेवक राहिलो आणि तुमच्यामुळेच मागची 10 वर्षे आमदार आहे. तुमच्यामुळे विधानभवनात पोहचु शकलो तुमचे मनापासुन आभार. आभाळएवढं प्रेम केलत माझ्यावर, इथुन पुढे ही करत राहा. माझ्यासारख्या साध्या माणसाला सलग सेवेची संधी दिलीत. मी शिवसेनेचा सैनिक तुमच्यासाठी काम करणं हे माझं आणि शिवसेनेचं कर्तव्यच. मी संजय शिरसाट ऑन ड्युटी चोवीस तास आपल्या सेवेत''............पत्रातील असा मजकुर वाचून दाखवत पोस्टमनदादांचा हा प्रचार चांगला चर्चेत आला आहे. हे पोस्टमन प्रत्येक चौकांतचौकांत जाऊन हे पत्र वाचून नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com