शिवसेना माझ्यावर तुटून पडेल याला माझीही तयारी- हर्षवर्धन जाधव 

लोकसभा निवडणुकीत देखील कन्नडमधून हर्षवर्धन जाधव खैरेंच्या तुलनेत पिछाडीवर होते. पण जाधव यांच्या बंडखोरीमुळेच शिवसेनेचा बालेकिल्ला ढासळला, याचे शल्य जिल्ह्यातील शिवसैनिकांच्या मनात आहे. या पराभवाचे उट्टे दोन महिन्यांनी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत काढण्याचा चंग शिवसेनेने बांधला आहे.
शिवसेना माझ्यावर तुटून पडेल याला माझीही तयारी- हर्षवर्धन जाधव 

औरंगाबाद : लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर आता विधानसभेला कन्नडमध्ये मला पराभूतर करण्यासाठी शिवसेना माझ्यावर तुटून पडेल, याची मला जाणीव आहे. पण त्याला कस तोंड द्यायचं हे मला चांगल माहित आहे, तशी तयारी देखील मी सुरू केली असल्याचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी 'सरकारनामा'शी बोलतांना सांगितले. हर्षवर्धन जाधव यांच्या अपक्ष उमेदवारीमुळे औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे चंद्रकांत खैरे यांचा पराभव झाला होता. त्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीत कन्नडमधून जाधव यांना कुठल्याही परिस्थितीत धूळ चारण्याची तयारी शिवसेनेने सुरू केली आहे. 

लोकसभा निवडणुकीत देखील कन्नडमधून हर्षवर्धन जाधव खैरेंच्या तुलनेत पिछाडीवर होते. पण जाधव यांच्या बंडखोरीमुळेच शिवसेनेचा बालेकिल्ला ढासळला, याचे शल्य जिल्ह्यातील शिवसैनिकांच्या मनात आहे. या पराभवाचे उट्टे दोन महिन्यांनी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत काढण्याचा चंग शिवसेनेने बांधला आहे. या पार्श्‍वभूमीवर हर्षवर्धन जाधव यांनी आपली भूमिका स्पष्टपणे मांडली. 

जाधव म्हणाले, ''मतदारसंघात माझ्या विरोधात लढण्यासाठी शिवसेनेत इच्छुकांच्या रांगा लागल्या आहेत. मला पराभूत करण्यासाठी शिवसेना नजीकच्या काळात माझ्यावर अगदी खालच्या स्तरावर, वैयक्तिक आरोप करण्याची देखील शक्‍यता आहे. ते माझ्यावर तुटून पडतील यांची मला पुर्णपणे जाणीव आहे, पण त्यांच्या या हल्याला कसे तोंड द्यायचे हे मला चांगले ठाऊक आहे. मी तशी तयारी देखील सुरू केली आहे.''

मतदारसंघ माझ्या पाठीशी
''कन्नड-सोयगांव विधानसभा मतदारसंघ हा जाधव कुटुंबाच्या कायम पाठीशी उभा राहिला आहे. माझ्या वडलांपासून आम्ही गेली तीस-चाळीस वर्ष मतदारांची सेवा करतो आहोत. येणाऱ्या निवडणुकीत देखील मतदारसंघातील जनता माझ्या पाठीशी खंबीरपणे उभी राहील आणि मला निवडूण देईल याबद्दल माझ्या मनांत किंचितही शंका नाही,'' असा दावा देखील हर्षवर्धन जाधव यांनी यावेळी केला. 

विधानसभा कुठल्या पक्षाकडून लढणार या प्रश्‍नावर, मी कुठल्याही पक्षात जाणार नाही, माझा स्वःताचा पक्ष असल्यामुळे मी शिवस्वराज्य बहुजन पक्षाकडूनच निवडणूक लढवणार असल्याचे जाधव यांनी स्पष्ट केले. वंचित बहुजन आघाडीकडून लढणार असल्याच्या चर्चा निराधार आहेत, असा माझा कोणाताही विचार नाही असेही जाधव यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com