'जनता कर्फ्यू'मध्ये जन्माला आलेल्या मुलीला पोलीस अधिकारी बनवणार....

रस्त्यावर एकही वाहन नाही, १०८ क्रमांकाच्या वाहनाला फोन केला पण त्यालाही यायला उशीर झाला. अशावेळी गर्भवती महिलेच्या पतीने पोलिसांना आपली अडचण सांगितली ,पोलिसांनीही तात्काळ माणुसकीचे दर्शन घडवत सदर महिलेला आपल्या वाहनातून घाटी रुग्णालयात सुखरूप पोहोचवले
Aurangabad Police Helped Pregnant Women in Janta Curfew
Aurangabad Police Helped Pregnant Women in Janta Curfew

औरंगाबाद : देशभरासह शहरात काल 'जनता कर्फ्यू'ला प्रचंड प्रतिसाद मिळाला. कधीही न थांबणाऱ्या शहरात सकाळी सात वाजल्यापासून ते रात्री उशिरापर्यंत रस्त्यावर चिटपाखरूही दिसत नव्हते. अशातच दुपारी एका महिलेला प्रसुती वेदना सुरू झाल्या, कसंबसं खाजगी रुग्णालयात दाखल केले, पण प्रकृती बिघडल्यामुळे शासकीय रुग्णालयात न्यावे लागले .

पण रस्त्यावर एकही वाहन नाही, १०८ क्रमांकाच्या वाहनाला फोन केला पण त्यालाही यायला उशीर झाला. अशावेळी गर्भवती महिलेच्या पतीने पोलिसांना आपली अडचण सांगितली ,पोलिसांनीही तात्काळ माणुसकीचे दर्शन घडवत सदर महिलेला आपल्या वाहनातून घाटी रुग्णालयात सुखरूप पोहोचले. सायंकाळी पाच वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनानुसार डॉक्टर ,सरकारी कर्मचारी, पोलीस अधिकारी,  सफाई कर्मचारी अशा सगळ्याच लोकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी घंटानाद सुरू झाला. या घंटानादातच घाटीत दाखल केलेल्या गर्भवती महिलेने गोंडस मुलीला जन्म दिला .

ही गोड बातमी बाळाचे वडील संतोष थोटे यांनी ज्या पोलीस अधिकाऱ्यांनी पत्नीला घाटीत दाखल करण्यासाठी मदत केली त्यांना दिली. पहिली मिठाई साहेब तुम्हाला देईन, असे म्हणत त्यांचे आभार व्यक्त केले. शहरभर घंटानाद सुरू असताना गोंडस मुलीला जन्म देणाऱ्या शितल थोटे यांनीदेखील पोलिसांचे आभार मानले. ज्या पोलिसांच्या गाडीतून मला रुग्णालयात दाखल करण्यात आले, त्याच पोलीस खात्यात मोठी झाल्यावर माझी मुलगी पोलीस अधिकारी म्हणून काम करेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com