आक्षेपार्ह पोस्ट टाकली; औरंगाबादेत डॉक्टरवर गुन्हा 

फेसबुकवर तबलिगीसंबंधित आणखी आक्षेपार्ह मजकूर पोस्ट करणाऱ्या औरंगाबादेतील एका डॉक्टरविरुद्ध पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात रविवारी (ता. पाच) गुन्ह्याची नोंद करण्यात आली.
aurangabad police registered fir against doctor for facebook post about tablighi
aurangabad police registered fir against doctor for facebook post about tablighi

औरंगाबाद ः फेसबुकवर तबलिगीसंबंधित आणखी आक्षेपार्ह मजकूर पोस्ट करणाऱ्या औरंगाबादेतील एका डॉक्टरविरुद्ध पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात रविवारी (ता. पाच) गुन्ह्याची नोंद करण्यात आली. 

पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार, संभाजी गोविंद चितळे (वय ३८, रा. मायानगर, सिडको-दोन) असे या डॉक्टरचे नाव आहे. ते कान-नाक-घसा डॉक्टर आहेत. 

औरंगाबाद मौलाना साद यांनी दिल्ली येथे घेतलेल्या तबलिगी जमात कार्यक्रमामुळे कोरोना भारत देशात पसरला, असे म्हणून त्यांच्यासंबंधी आक्षेपार्ह मजकूर डॉक्टरने फेसबुकवर पोस्ट केला. ही बाब पोलिसांच्या लक्षात आल्यानंतर पोलिस उपनिरीक्षक प्रभाकर रामदास सोनवणे यांनी यासंबंधी तक्रार दिली. 

आक्षेपार्ह पोस्ट सार्वजनिक ठिकाणी पसरविली, त्यामुळे एखाद्या वर्गातील किंवा समाजातील व्यक्तींना दुसऱ्या कोणत्याही वर्गाविरुद्ध किंवा समूहाविरुद्ध कोणताही अपराध करण्यास, चिथावणी देण्याच्या उद्देशाने त्यांनी सदरचे कृत्य केल्याचे पोलिसांना दिसून आले. त्यामुळे त्यांनी या डॉक्टरविरुद्ध जातीय तेढ निर्माण केली म्हणून गुन्ह्याची नोंद केली.

देशात सध्या कोरोनाचे महासंकट आहे. अशा स्थितीत कोरोनासंबंधी कोणतीही आक्षेपार्ह किंवा अफवा पसरवणारे पोस्ट करू नये असे आदेश असतानाही डॉक्टरने अशा आशयाची पोस्ट केली, त्यामुळे ही पोस्ट त्यांच्या अंगलट आली आहे.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com