Aurangabad News Sharad Pawar Claims that People Will Defeat BJP Government | Sarkarnama

महाराष्ट्रातील जनतेनं हे सरकार पायउतार करायच ठरवलयं- शरद पवार

सुभाष बिडे
रविवार, 13 ऑक्टोबर 2019

''मोदी, शहा, नड्डा, मुख्यमंत्र्यांना इथे येऊन ठिकठिकाणी सभा घ्याव्या लागताहेत, त्यांच्या सभेला पन्नाल लोकही जमत नाही, कारण महाराष्ट्रातील जनतेने या सरकारला सत्तेवरून खाली खेचायचं ठरवलंय,'' असा टोला राष्ट्रवादीचे अध्यक्ष माजी केंद्रीयमंत्री शरद पवार यांनी लगावला. घनसावंगी येथील प्रचार सभेत बोलतांना त्यांनी केंद्र व राज्यातील भाजप सरकारवर जोरदार टिका केली, मुख्यमंत्र्यांच्या आमचे पैलवान तेल लावून कुस्तीसाठी तयार आहेत, पण समोर विरोधकच नाही या विधानाचा देखील पवारांनी पुन्हा एकदा समाचार घेतला.

घनसावंगी : ''मोदी, शहा, नड्डा, मुख्यमंत्र्यांना इथे येऊन ठिकठिकाणी सभा घ्याव्या लागताहेत, त्यांच्या सभेला पन्नाल लोकही जमत नाही, कारण महाराष्ट्रातील जनतेने या सरकारला सत्तेवरून खाली खेचायचं ठरवलंय,'' असा टोला राष्ट्रवादीचे अध्यक्ष माजी केंद्रीयमंत्री शरद पवार यांनी लगावला. घनसावंगी येथील प्रचार सभेत बोलतांना त्यांनी केंद्र व राज्यातील भाजप सरकारवर जोरदार टिका केली, मुख्यमंत्र्यांच्या आमचे पैलवान तेल लावून कुस्तीसाठी तयार आहेत, पण समोर विरोधकच नाही या विधानाचा देखील पवारांनी पुन्हा एकदा समाचार घेतला.

शरद पवार म्हणाले, ''देवेंद्र फडणवीस सांगतात की आखड्यात आमचा पैलवान कुस्तीसाठी तयार आहे. विरोधकांचे पैलवान तयार नाहीत. हे खरं आहे, कारण कुस्तीगीर परिषदेचा अध्यक्ष असल्याने आम्ही खऱ्या पैलवानांशी लढतो. पाच वर्षापूर्वी अमित शहा हे नाव ऐकलं होत का? आम्ही 52 वर्षात 14 निवडणूका लढवल्या एकही निवडणूक हरलो नाही. हे केवळ जनतेच्या आशिर्वादामुळे. आणि आताचे सत्ताधारी आम्हाला विचारतात की तुम्ही काय केलं?''

''शिवाजी महाराजांच्या नावाने राजकारण करणाऱ्यांनी अरबी समुद्रात भव्य स्वागत करू, असे सांगितले. पंतप्रधान मोदींनी समुद्रात जाऊन पूजन केले, पण पाच वर्ष झाले हे स्मारक रेगांळले आहे. शिवाजी महाराजांचे किल्ले पर्यटनासाठी खुले करू असे सांगीतीले जाते. मात्र ज्या किल्यांनी इतिहास निर्माण केला त्याठिकाणी आता हे सरकार नाचगाणे, आणि छमछम सुरू करणार आहे. हा शिवाजी महाराजांचा इतिहास आहे का?'' असा संतप्त सवाल देखील पवारांनी यावेळी केला.

''शरद राव तुम्ही काय केलं, असे विचारणाऱ्यांना मी सांगू इच्छितो की आम्ही असले धंदे केले नाहीत. राज्य सरकारने नाबार्ड संस्थेला कर्ज दिले म्हणून सर्व संचालक शरद पवार यांना ओळखतात म्हणून मला ईडीची नोटीस पाठविली. पण जेव्हा मी ईडीच्या कार्यालयात जाण्याचे ठरविले, तेव्हा मात्र दिल्ली व राज्यातून जावू नका असे फोन आले. पोलीस आयुक्तांनी राज्यातील वातावरण बिघडेल अशी भिती व्यक्त केली आणि मला जाऊ दिले नाही,'' असेही शरद पवारांनी यावेळी सांगितले.
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख