राष्ट्रवादीचे माजी शहराध्यक्ष काशिनाथ कोकाटे भाजपच्या वाटेवर?   

लोकसभा निवडणुकीपासून राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसच्या पक्षातील अनेकांनी पक्षाची साथ सोडत कमळ हाती घेतले. हे इनकमिंग भाजप आणि शिवसेना या दोन्ही पक्षांकडे सुरु झाले आहे. मराठवाड्यातही बीडचे राष्ट्रवादीचे आमदार जयदत्त क्षीरसागर यांनी शिवबंधन हाती घेतले. यासह आमदार राहुल मोटे,आमदार राणा जगजितसिंग हे भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा होत आहे. त्यानंतर औरंगाबादेतून काशिनाथ कोकाटे यांचे नाव समोर येत आहे.
राष्ट्रवादीचे माजी शहराध्यक्ष काशिनाथ कोकाटे भाजपच्या वाटेवर?   

औरंगाबाद : आगामी विधानसभाच्या अनुषंगाने राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस मधून भारतीय जनता पक्षात मोठ्या प्रमाणावर इनकमिंग सुरु झालेआहे. यात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे औरंगाबाद माजी शहराध्यक्ष काशिनाथ कोकाटे भाजप मध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा शहरात सुरु झाली आहे. राज्यमंत्री अतुल सावे यांच्याह एका शिष्टमंडळाने कोकाटे यांच्या घरी सदिच्छा भेट दिली. त्यानंतर पक्ष प्रवेशासंदर्भात ही भेट असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे. 

लोकसभा निवडणुकीपासून राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसच्या पक्षातील अनेकांनी पक्षाची साथ सोडत कमळ हाती घेतले. हे इनकमिंग भाजप आणि शिवसेना या दोन्ही पक्षांकडे सुरु झाले आहे. मराठवाड्यातही बीडचे राष्ट्रवादीचे आमदार जयदत्त क्षीरसागर यांनी शिवबंधन हाती घेतले. यासह आमदार राहुल मोटे,आमदार राणा जगजितसिंग हे भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा होत आहे. त्यानंतर औरंगाबादेतून काशिनाथ कोकाटे यांचे नाव समोर येत आहे. 

2005 मध्ये राष्ट्रवादी पक्षातून काशिनाथ कोकाटे भाजप मध्ये दाखल झाले होते. मात्र, महापालिकेच्या निवडणुकीत सिडको एन-8च्या वार्डची जागा भाजपा ऐवजी शिवसेनेला गेल्यामूळे कोकाटे यांनी ती अपक्ष निवडणुक लढवित विजय मिळवला होता. त्यासाठी भाजपचा पाठिंबा घेतला होता. त्यानंतर 2009 विधानसभा निवडणुकीत भाजपचे उमेदवार डॉ. भागवत कराड यांच्या विरोधात अपक्ष निवडणुक लढविल्यानंतर कोकाटे राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. त्यानंतर ते आता पुन्हा भाजपात येणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे. 

नगरसेवकपदासह राष्ट्रवादीचे शहाराध्यक्षपद काशिनाथ कोकाटे यांनी ऑगस्ट 2019 पर्यंत संभाळले. बुधवारी राज्यमंत्री अतुल सावे, भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य अनिल मकरिये,गटनेते प्रमोद राठोड,नगरसेवक शिवाजी दांडगे यांच्यासह एक शिष्टमंडळाने काशिनाथ कोकाटे यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. यावेळी कोकाटे यांच्यासह त्यांचे मित्र काँग्रेसचे नारायण अण्णा सुरगोणीवार यांची उपस्थिती होती. या भेटीत प्रवेशासंबंधित चर्चा झाली असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हा प्रवेश होणार असल्याची माहिती भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य अनिल मकरिये यांनी दिली.

बरेच दिवसापासून त्यांची भाजपात प्रवेश करण्याची हालचाली सुरु केल्या होत्या. अनेक वर्षे राष्ट्रवादीत काम केलेले कोकाटे मुख्यमंत्र्याच्या उपस्थितीत सांस्कृतिक क्रीडा मंडळाच्या मैदानावर प्रवेश करणार आहेत. यात शहरातील आणखी काही लोक आहेत. मात्र, त्यांची नावे आमच्यापर्यंत आली नसल्याचे नगरसेवक शिवाजी दांगडे यांनी सांगितले. 

राज्यमंत्री अतुल सावे इतर लोक त्यांच्या बजरंग चौकातील संपर्क कार्यालयात आले होते. सिडकोच्या लिज होल्ड टू फ्रि होल्ड विषयी आम्ही प्रश्‍न उपस्थित केले होते. त्यामुळे सिडको प्रश्‍ना विषयी चर्चा करण्यासाठी राज्यमंत्री सावे आमच्या घरी आले होते. यात भाजपच्या प्रवेशावर कुठलीही चर्चा झाली नाही. प्रवेशाबाबत विचार केलेला नाही - काशिनाथ कोकाटे

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com