खासदार इम्तियाज जलील- कादीर मौलाना यांच्यात हाणामारी (व्हिडिओ)

एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील व मध्य मतदारसंघातील राष्ट्रवादी-कॉंग्रेस महाआघाडीचे उमेदवार कदीर मौलाना यांच्यात कटगेट भागातील बुथजवळ हाणामारी झाल्याची घटना सायंकाळी पाचच्या सुमारास घडली. या प्रकारामुळे कटकटगेट भागात प्रचंड तणावाचे वातावरण असून प्रचंड पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. दरम्यान, कादीर मौलाना यांच्यावर कारवाई करा या मागणीसाठी इम्तियाज जलील यांच्यासह एमआयएमचे पाचशेहून अधिक समर्थक रस्त्यावर ठिय्या मारून बसले आहेत.
Mob Gathered in Aurangabad After Fighting Between Imtiaz Jalil And Quadir Maulana
Mob Gathered in Aurangabad After Fighting Between Imtiaz Jalil And Quadir Maulana

औरंगाबादः एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील व मध्य मतदारसंघातील राष्ट्रवादी-कॉंग्रेस महाआघाडीचे उमेदवार कदीर मौलाना यांच्यात कटगेट भागातील बुथजवळ हाणामारी झाल्याची घटना सायंकाळी पाचच्या सुमारास घडली. या प्रकारामुळे कटकटगेट भागात प्रचंड तणावाचे वातावरण असून प्रचंड पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. दरम्यान, कादीर मौलाना यांच्यावर कारवाई करा या मागणीसाठी इम्तियाज जलील यांच्यासह एमआयएमचे पाचशेहून अधिक समर्थक रस्त्यावर ठिय्या मारून बसले आहेत.

मतदानाच्या शेवटच्या टप्यात शहरातील कटकटगेट भागात मतदानातील वादातून राष्ट्रवादीचे मध्यमधील उमेदवार कदीर मौलाना आणि खासदार इम्तियाज जलील यांच्यात आधी वादावादी आणि नंतर त्याचे पर्यावसन हाणामारीत झाले. यावेळी इम्तियाज जलील यांचे कपडे देखील फाटले होते. या प्रकारामुळे राष्ट्रवादी व एमआयएमचे समर्थक समोरासमोर आल्याने मोठा तणाव निर्माण झाला. जोरदार घोषणाबीज सुरू झाल्याने पोलीसांनी तात्काळ जमावाला पांगवण्याचा प्रयत्न केला.

पण जमाव संतप्त झाल्याने पोलीसांची अतिरिक्त कुमक कटकटगेट भागात बोलावण्यात आली. दरम्यान, इम्तियाज जलील यांना मारहाण झाल्याची माहिती कळताच एमआयएमचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने कटकटगेट भागात दाखल झाल्याने वातावरण अधिकच तापले. कदीर मौलाना यांच्याविरोधात घोषणाबाजी करणाऱ्या एमआयएम कार्यकर्त्यांना समजावण्याचा पोलीस प्रयत्न करत होते. पण ते ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. कदीर मौलाना यांच्यावर कारवाई करा या मागणीसाठी खासदार इम्तियाज जलील यांच्यासह शकडो कार्यकर्ते इकरा शाळेजवळ रस्त्यावर ठाण मांडून बसले होते. पोलीसांनी जमावाला पांगवण्यासाठी लाठीमार केला.  परंतु, अजूनही या भागात कार्यकर्ते आक्रमक असून पोलीसांचा तगडा बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com