फुलंब्रीत अब्दुल सत्तारांचा भव्य सत्कार  - शिवसेनेचे राजेंद्र ठोंबरे यांचा पुढाकार

मागील गेल्या सहा महिन्यांपासून अब्दुल सत्तार यांच्या पक्ष प्रवेशाचे तळ्यात मळ्यात सुरू होते. मात्र, अचानक 'यू-टर्न' घेऊन सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर प्रथमच फुलंब्रीतुन सिल्लोडकडे जात असताना येथील महात्मा फुले चौकात अब्दुल सत्तार यांचा फटाक्याची आतषबाजी करीत ढोलताशांच्या गजरात भव्य सत्कार करण्यात आला.
Abdul Sattar Felicitation in Fulambri
Abdul Sattar Felicitation in Fulambri

फुलंब्री : मागील गेल्या सहा महिन्यांपासून अब्दुल सत्तार यांच्या पक्ष प्रवेशाचे तळ्यात मळ्यात सुरू होते.  मात्र, अचानक 'यू-टर्न' घेऊन सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर प्रथमच फुलंब्रीतुन सिल्लोडकडे जात असताना येथील महात्मा फुले चौकात अब्दुल सत्तार यांचा फटाक्याची आतषबाजी करीत ढोलताशांच्या गजरात भव्य दिव्य सत्कार रविवारी (ता.आठ) रोजी करण्यात आला.

शिवसेनेचे तालुका प्रमुख राजेंद्र ठोंबरे यांनी सत्कार समारंभाचे आयोजन केले होते. सिल्लोड येथील काँग्रेसचे बंडखोर आमदार अब्दुल सत्तार यांनी लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी दिली. त्यांनतर भाजपच्या प्रवेश निश्चित झाला मात्र सिल्लोड येथील स्थानिक भाजप नेते मंडळीने कट्टर विरोध केला. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी सत्तार यांच्या प्रवेशासाठी पक्षाची दारे खुली केली मात्र स्थानिक कार्यकर्त्यांचा विरोध होत असल्यामुळे सत्तारांची डोकेदुखी वाढत गेली. तरीही स्थानिक कार्यकर्त्यांना न जुमानता आपले शक्तिप्रदर्शन दाखवून मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेचे जोरदार स्वागत केले. थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सत्तार यांना हात देऊन चक्क रथावर घेतले. मात्र, त्यानंतर अब्दुल सत्तार यांनी अचानक निर्णय बदलून थेट मातोश्री गाठून शिवसेनेत प्रवेश जाण्याचा निर्णय घेतला. 

वडिलांचा राजीनामा मंजूर करण्यासाठी विधानसभा अध्यक्षांचा पाठलाग करून सत्तार यानी आपल्या मुलाकडे राजीनामा दिला. त्यानंतर उपनगराध्यक्ष अब्दुल समीर याने नवनिर्वाचित आमदार अंबादास दानवे यांना सोबत घेऊन थेट गणोरी (ता.फुलंब्री) गाठून हरिभाऊ बागडे यांची भेट घेऊन राजीनामा मंजूर करून घेतला. त्यानंतर मातोश्रीवर शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सत्तार यांना शिवबंधनात अडकवले. शिवबंधनात पडल्यानंतर प्रथमच सत्तार फुलंब्रीत आल्याने त्यांचा जंगी सत्कार करण्यात आला. यावेळी शिवसेनेचे तालुका प्रमुख राजेंद्र ठोंबरे, शहर प्रमुख रमेश दुतोंडे,मधुकर सोनवणे, गणेश आढाव, सुरेश दुतोंडे, उत्तम ढोके, सुरेश गंगावणे, भगवान ढोके, भागीनाथ नागरे, सद्दाम शेख, मौसीन खान, उमेश मिसाळ, ज्ञानेश्वर तावडे, हरिदास घरमोडे, जमीर पठाण, फय्याज पटेल आदींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com