औरंगाबाद महापालिका उपायुक्त मंजूषा मुथा अखेर कार्यमुक्त

बदली झाल्यानंतर तब्बल दीड महिन्यापासून महापालिकेत ठाण मांडून असलेल्या उपायुक्त मंजूषा मुथा यांना विभागीय आयुक्त कार्यालयाने शुक्रवारी (ता.27) अखेर कार्यमुक्त केले. त्याचा पदभार इतर अधिकाऱ्यांना द्यावेत, असे आदेश महापालिका आयुक्तांना देण्यात आले आहेत.
औरंगाबाद महापालिका उपायुक्त मंजूषा मुथा अखेर कार्यमुक्त

औरंगाबाद  ः बदली झाल्यानंतर तब्बल दीड महिन्यापासून महापालिकेत ठाण मांडून असलेल्या उपायुक्त मंजूषा मुथा यांना विभागीय आयुक्त कार्यालयाने शुक्रवारी (ता.27) अखेर कार्यमुक्त केले. त्याचा पदभार इतर अधिकाऱ्यांना द्यावेत, असे आदेश महापालिका आयुक्तांना देण्यात आले आहेत.

महापालिकेत शासनाकडून प्रतिनियुक्‍तीने आलेल्या उपायुक्‍त मंजूषा मुथा यांची राज्य शासनाने आठ नोव्हेंबरला नांदेड येथे उपजिल्हाधिकारी म्हणून बदली केली आहे. मात्र, या बदलीची माहिती समोर आलीच नाही. तत्कालीन आयुक्त डॉ. निपुण विनायक, तत्कालीन प्रभारी आयुक्त तथा जिल्हाधिकारी उदय चौधरी व विद्यमान आयुक्त आस्तिककुमार पांडेय यांनी त्यांना कार्यमुक्त केले नव्हते. तब्बल महिनाभरानंतर मुथा यांची बदली झाल्याचे समोर आले. 

यासंदर्भात महापौर नंदकुमार घोडेले यांनी आस्थापना विभागाकडून अहवाल मागविला होता. त्यावर आस्थापना अधिकारी विक्रम दराडे यांनी मुथा यांच्या बदलीसंदर्भात अधिकृत पत्र अद्याप प्रशासनाला प्राप्त झाले नसल्याचा अजब खुलासा केला होता. ही चर्चा दिल्ली दौऱ्यावर असलेले आयुक्‍त पांडेय यांच्याही कानावर गेली. त्यामुळे त्यांनी आस्थापना विभागाचे दराडे यांना मुथांना कार्यमुक्‍त करण्याची प्रशासकीय कार्यवाही पूर्ण करण्याचे आदेश शुक्रवारी दिल्याचे सूत्रांनी सांगितले.

दरम्यान, विभागीय आयुक्त कार्यालयानेदेखील या बदली प्रकरणाची दखल घेतली. महसूल विभागाचे सहायक आयुक्त डॉ. एस. पी. सावरगावकर यांनी काढलेल्या आदेशात नमूद केले आहे, की श्रीमती मुथा यांना पदस्थापनेच्या जागेवर रुजू होण्यासंदर्भात विभागीय आयुक्तांनी सूचित केले होते. त्यांना 27 डिसेंबरला कार्यमुक्त करण्यात येत आहे. त्यामुळे त्यांचे पदभार महापालिका आयुक्तांनी इतर अधिकाऱ्यांकडे सोपवावे.

शेवटपर्यंत केले कामकाज
मुथा यांनी आपल्या दीड वर्षांच्या कार्यकाळात पालिकेतील नोकरभरती, कर्मचारी भरतीचा आकृतिबंध, प्रभागरचना यासह अनेक कामे त्यांनी मार्गी लावली. शुक्रवारीदेखील कार्यालयीन वेळ संपेपर्यंत त्यांनी कामकाज केले. आपल्या हातावरील एकही फाइल त्यांनी अपूर्ण सोडली नाही, असे सूत्रांनी सांगितले.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com