तिजोरीतील खडखडामुळे महापालिकेचा वर्धापनदिन प्रायोजकांच्या पैशाने
औरंगाबाद : महापालिकेच्या तिजोरीत खडखडाट असल्यामुळे यंदा वर्धापनदिन बिनपैशांचा म्हणजेच प्रायोजक घेऊन साजरा केला जाणार आहे. त्यामुळे आयजीच्या जीवावर बायजी उदार अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. महापालिकेचा आठ डिसेंबरला 37 वा वर्धापनदिन आहे. महापालिकेतर्फे गेल्या काही वर्षांपासून वर्धापनदिन धुमधडाक्यात साजरा केला जातो; मात्र महापालिकेच्या तिजोरीची अवस्था आणि होणारी टीका पाहता यावेळी वर्धापनदिनाला कुठलाही थाटमाट न करता साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विशेष म्हणजे वर्धापनदिनाच्या खर्चाचा भार प्रायोजकांवर टाकण्यात येणार आहे.

गेल्यावर्षी महापालिकेला प्रायोजक मिळवण्यात अपयश आले होते, यंदा मात्र काही प्रायोजक गळाला लागले आहेत. वर्धापनदिनानिमित्त आठ डिसेंबरला सकाळी शहरातील महापुरुषांच्या पुतळ्यांची स्वच्छता व अभिवादन केले जाणार असून नऊ वाजता सिद्धार्थ उद्यानात महापालिका अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले आहे. 11 ते 2 वाजेदरम्यान मुख्यालयात महापौर संघ विरोधात आयुक्त संघ असा क्रिकेट सामना, सकाळी 9.30 ते 11.30 या वेळात फनीगेम आणि रस्सीखेच आणि दुपारी बारा वाजता पालिका शाळांतील तसेच अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या गुणवंत मुलांचा सत्कार करण्यात येणार आहे. याशिवाय अग्निशमन विभागाच्या नव्या गाड्यांचे लोकार्पण, सार्वजनिक स्वच्छतागृहांच्या कामाचे भूमिपूजन, विविध सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात येणार आहे.