aurangabad mp election | Sarkarnama

झांबड यांचे उमेदवारीसाठी पृथ्वीराज चव्हाणांना साकडे

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 1 नोव्हेंबर 2018

औरंगाबाद : लोकसभेची निवडणूक लढवू इच्छिणारे औरंगाबाद-जालना स्थानिक स्वराज्य संस्थेचे विद्यमान आमदार सुभाष झांबड यांचा पत्ता कट झाल्याने त्यांनी आता माजी मुख्यमंत्री व कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांचा आधार घेतला आहे. लोकसभा निवडणुकीत उमेदवारी मिळाल्यास झांबड निवडून येणार नाहीत असा पक्षाने केलेल्या सर्वेक्षणाचा अहवाल असल्याचे जिल्हाध्यक्ष आमदार अब्दुल सत्तार यांनी नुकतेच जाहीर केले. या पार्श्‍वभूमीवर झांबड यांनी पृथ्वीराज चव्हाण यांच्या मार्फत उमेदवारीसाठी प्रयत्न सुरु केल्याचे बोलले जाते. 

औरंगाबाद : लोकसभेची निवडणूक लढवू इच्छिणारे औरंगाबाद-जालना स्थानिक स्वराज्य संस्थेचे विद्यमान आमदार सुभाष झांबड यांचा पत्ता कट झाल्याने त्यांनी आता माजी मुख्यमंत्री व कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांचा आधार घेतला आहे. लोकसभा निवडणुकीत उमेदवारी मिळाल्यास झांबड निवडून येणार नाहीत असा पक्षाने केलेल्या सर्वेक्षणाचा अहवाल असल्याचे जिल्हाध्यक्ष आमदार अब्दुल सत्तार यांनी नुकतेच जाहीर केले. या पार्श्‍वभूमीवर झांबड यांनी पृथ्वीराज चव्हाण यांच्या मार्फत उमेदवारीसाठी प्रयत्न सुरु केल्याचे बोलले जाते. 

सुभाष झांबड यांच्याकडे औरंगाबाद लोकसभेचे संभाव्य उमेदवार म्हणून पाहिले जात होते. त्यांनी देखील जिल्हाभर दौरे करत भेटीगाठीवर जोर दिला होता. ग्रामीण भागातून काढण्यात आलेल्या कॉंग्रेसच्या यल्गार यात्रेत देखील झाबंड यांनी तन-मन-धनाने सहभाग नोंदवला. पण सत्तार यांनी आधी त्यांच्या नावाची केलेली शिफारस, त्यावरून प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी व्यक्त केलेली नाराजी याचे पडसाद काही दिवसांतच उमटले. 

लोकसभेची उमेदवारी झांबड यांना द्या अशी शिफारस पक्षाकडे करणारे जिल्हाध्यक्ष अब्दुल सत्तार यांनीच एका अहवालाचा दाखला देत झाबंड यांच्या उमेदवारीवर प्रश्‍न चिन्ह निर्माण केले. एवढेच नाही तर पक्षाने केलेला सर्व्हे त्यांच्या विरोधात असल्यामुळे त्यांना पक्षाकडून उमेदवारी दिली जाणार नसल्याचे जाहीर करून टाकले. तेव्हापासून आमदार झांबड कॉंग्रेसच्या कार्यक्रमापासून चार हात लांब रहायला लागले. 

झाबंडांना बाबांकडून अपेक्षा? 
कॉंग्रेसकडून औरंगाबाद लोकसभा निवडणूक लढवण्याची सुभाष झांबड यांची तीव्र इच्छा आहे. आपण नक्कीच विजयी होऊ असा विश्‍वास देखील त्यांना आहे. परंतु मध्यंतरीच्या काळात घडलेल्या घडामोडी पाहता प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण आणि जिल्हाध्यक्ष अब्दुल सत्तार यांना मात्र झांबड उमेदवार म्हणून नको असेच वाटत असल्याची चर्चा आहे. 

जनसंघर्ष यात्रेच्या निमित्ताने कॉंग्रेसचे राज्यातील प्रमुख नेते सध्या शहरात दाखल झालेले आहेत. अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, राधाकृष्ण विखे पाटील आणि आज समारोपाच्या सभेसाठी दिल्लीतील गुलामनबी आझाद, मल्लिकार्जून खरगे हे देखील येणार आहेत. या निमित्ताने प्रसिध्दीस देण्यात आलेल्या जाहिरातींमध्ये सुभाष झांबड यांना स्थान देण्यात आले आहे. परंतु पक्षावर नाराज असलेल्या झाबंड यांनी मात्र नेत्यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या जाहीर सभा व मेळाव्याकडे पाठ फिरल्याचे दिसून आले. 

अशोक चव्हाण, राधाकृष्ण विखे पाटील यांच्यापासून अंतर राखत असलेल्या सुभाष झांबड यांनी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची मात्र हॉटेलात जाऊन भेट घेत त्यांच्याशी चर्चा केल्याची माहिती समोर आली आहे. पृथ्वीराज चव्हाण यांचे दिल्ली दरबारी वजन आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होण्याआधी केंद्रातील युपीए सरकारमध्ये चव्हाण मंत्री होते. सोनिया गांधी, राहूल गांधी यांचे विश्‍वासू अशी त्यांची ओळख आहे. शिवाय आपल्या मुख्यमंत्रीपदाच्या काळातच 2013 मध्ये सुभाष झांबड यांना औरंगाबाद-जालना स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून पृथ्वीराज चव्हाण यांनी उमेदवारी देऊन निवडून आणले होते. 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख