संरक्षक भिंत हरवली, शोधून द्या; मनसेचे महापालिकेला निवेदन

एसटी कॉलनीतील छत्रपती शिवाजी महाराज मैदानाच्या चारही बाजूला पुर्वी संरक्षक भिंत होती. पण सध्या ती गायब झाली आहे. परिणामी मैदानाच्या चोहोबाजूला शहरातील विविध ठिकाणचा कचरा आणून टाकला जात आहे. मैदानावर रात्री दारूड्यांचे टोळके जमा होऊन गोंधळ घालत असल्याने याचा आसपासच्या भागातील नागरिकांना त्रास होत आहे.
MNS In Aurngabad Gave Memorandum About Missing Wall
MNS In Aurngabad Gave Memorandum About Missing Wall

औरंगाबाद : शहरातील छत्रपती शिवाजी महाराज मैदान येथील संरक्षक भिंत चोरीला गेली आहे, ती शोधून द्या, अशी मागणी मनसेने महापालिकेकडे केली आहे. विशेष म्हणजे निषेध म्हणून पदाधिकाऱ्यांनी शिपायाला निवदेन देण्याचा हट्ट धरत आपल्या अनोख्या आंदोलनाची परंपराही कायम ठेवल्याचे यावेळी दिसून आले.

एसटी कॉलनीतील छत्रपती शिवाजी महाराज मैदानाच्या चारही बाजूला पुर्वी संरक्षक भिंत होती. पण सध्या ती गायब झाली आहे. परिणामी मैदानाच्या चोहोबाजूला शहरातील विविध ठिकाणचा कचरा आणून टाकला जात आहे. मैदानावर रात्री दारूड्यांचे टोळके जमा होऊन गोंधळ घालत असल्याने याचा आसपासच्या भागातील नागरिकांना त्रास होत आहे. त्यामुळे मैदानाची संरक्षक भिंत शोधून द्या, अशी मागणी करणारे निवेदन आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने उपायुक्त सुमंत मोरे यांना देत घेराव घातला.

मैदानात नागरिकांच्या सांस्कृतिक व सामाजिक उपक्रमासाठी खुले सभागृह तयार करण्यात आले होते, मात्र या सभागृहाच्या मागील बाजूची भिंत पूर्णपणे तोडून मनपा प्रशासन व सत्ताधाऱ्यांच्या संगनमताने छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा मैदानाची जागा बिल्डरच्या घशात घालण्याचा घाट घातला जात असल्याचा आरोप देखील मनसेने केला आहे.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने असलेल्या या मैदानाची वाईट अवस्था झाल्याने जबादार अधिकारी म्हणून गांभीर्याने लक्ष द्यावे अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना आपल्या स्टाईल ने रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करेल. असा इशारा मनसेचे शहराध्यक्ष सतनामसिंग गुलाटी यांनी संबंधितांना दिला आहे. मैदानाची भिंत शोधून परिसरातील नागरिकांचा श्वास मोकळा करावा, तसेच संबंधितावर कठोर कारवाई करावी, अशी मागणीही महापौर, आयुक्त, उपायुक्त यांना दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com