कोण होणार औरंगाबादचा पुढचा महापौर ? आरक्षणाची उद्या मुंबईत सोडत

कोण होणार औरंगाबादचा पुढचा महापौर ? आरक्षणाची उद्या मुंबईत सोडत

औरंगाबाद : राज्यातील 27 महापालिकांसह औरंगाबाद शहरातील पुढचा महापौर कोणत्या प्रवर्गाचा होणार हे बुधवारी (ता.13) स्पष्ट होणार आहे. महापौर पदासाठी उद्या दुपारी तीन वाजता मंत्रालयात आरक्षण सोडत काढली जाणार आहे. प्रधान सचिवांच्या उपस्थित होणाऱ्या या सोडतीसाठी विद्यमान महापौर, स्थायी समिती सभापती व पदाधिकाऱ्यांना निमंत्रित करण्यात आले आहे. 

औरंगाबाद महापालिकेची मार्च किंवा एप्रिल 2020 मध्ये निवडणूक होणार आहे. त्यासाठी 27 नोव्हेंबरपर्यंत प्रभाग रचना तयार करून प्रस्ताव पाठविण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाने महापालिकेला दिले आहेत. महापालिका प्रशासनातर्फे प्रभाग रचना तयार केली जात असतानाच बुधवारी राज्यातील 27 महापालिकांच्या महापौरपदाच्या आरक्षणाची सोडत मुंबई मंत्रालयात काढली जाणार आहे. 

औरंगाबादसह इतर महापालिकांच्या निवडणुका आगामी काळात होणार आहेत. त्यानुसार आरक्षण सोडतील महत्त्व प्राप्त झाले आहे. आरक्षण सोडतीसाठी महापौर, स्थायी सभापती, सभागृहनेता, विरोधी पक्षनेता यांना निमंत्रित करण्यात आले आहे. यासंदर्भात अव्वर सचिवांचे पत्र महापालिकेला प्राप्त झाल्याचे सूत्रांनी सांगितले. 

महापौरपद अनुसूचित जातीसाठी राखीव ? 
महापालिकेच्या आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने राज्य शासनाच्या नगर विकास विभागाने ऑगस्ट महिन्यात माहिती मागविली होती. 2001 पासून आतापर्यंत महापौरपदासाठी निश्‍चित झालेला आरक्षणाचा प्रवर्ग, आरक्षण निश्‍चितीच्या अधिसूचनेची दिनांक, आरक्षणाचा कालावधी महापौरपदी विराजमान असलेल्या व्यक्तीचे नाव, सध्या सुरू असलेल्या महापौरपदाचा प्रवर्ग व कालावधी संपण्याची दिनांक, 2011 च्या जनगणेनुसार लोकसंख्येची माहिती मागविण्यात आली होती. ही माहिती महापालिकेने कळविल्यानंतर आरक्षण सोडत काढली जात आहे. औरंगाबाद महापालिकेत आतापर्यंत अनुसूचित जाती-जमाती प्रवर्गातून एकही महापौर झालेला नाही, त्यामुळे यावेळी अनुसूचित जातीसाठी आरक्षण सुटण्याची शक्‍यता व्यक्त केली जात आहे. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com