Aurangabad Kaygaon toka burning from last two days | Sarkarnama

मराठा आरक्षण आंदोलन : दोन दिवसांपासून धुमसतंय कायगांव टोका 

सरकारनामा ब्युरो 
मंगळवार, 24 जुलै 2018

मराठा क्रांती माेर्चाच्या आंदाेलनाचा केंद्रबिंदू ठरेलेले कायगांव टाेका गांव दाेन दिवसांपासून धुमसतंय. आैरंगाबाद-नगर-पुणे मार्गांवर गाेदावरी आणि प्रवरा नदीचा संगम जेथे हाेताे. तेथे कायगांव टाेका गाव आणि माेठा पूल आहे. या कायगांव टाेक्याच्या पुलावर आज दिवसभर वाहतूक बंद राहिली.

औरंगाबादः मराठा क्रांती माेर्चाच्या आंदाेलनाचा केंद्रबिंदू ठरेलेले कायगांव टाेका गांव दाेन दिवसांपासून धुमसतंय. आैरंगाबाद-नगर-पुणे मार्गांवर गाेदावरी आणि प्रवरा नदीचा संगम जेथे हाेताे. तेथे कायगांव टाेका गाव आणि माेठा पूल आहे. या कायगांव टाेक्याच्या पुलावर आज दिवसभर वाहतूक बंद राहिली. सोमवारी (ता. 23) मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलकांपैकी काकासाहेब दत्तात्रय शिंदे या युवकाने स्वःताला गोदापात्र झोकून दिले. यात त्यांचा दुदैर्वी अंत झाला.

पोलीस, राजकारण्यांवर आंदोलकांचा राग
आरक्षणाच्या मागणीसाठी काल गोदावरीत जलसमाधी घेतलेल्या काकासाहेब शिंदे यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार करण्यात आले. तेव्हा शिंदे कुटुंबियांचे सांत्वन करण्यासाठी शिवसेनेचे नेते व जिल्ह्याचे खासदार चंद्रकांत खैरे कायगांव येथे आले होते. पण आंदोलनात कुठल्याही राजकीय पक्ष किंवा लोकप्रतिनिधीला येऊ द्यायचे नाही अशी भूमिका मराठा क्रांती मोर्चाने यापुर्वीच जाहीर केली होती. त्यामुळे खैरे यांना पाहताच आंदोलक बिथरले. त्यांनी खैरे यांच्या विरोधात घोषणाबाजी करत त्यांना धक्काबुक्की केली आणि तिथून हुसकावून लावले. असाच अनुभव काँग्रेसचे आमदार सुभाष झाबंड यांना देखील आला.

काकासाहेब यांच्यावर अंत्यसंस्कार झाल्यानंतर आंदोलक अधिक आक्रमक झाले. त्यांनी पुन्हा कायगांव टोका पुलावर येऊन ठिय्या आंदोलन द्यायला सुरूवात केली. पुलावरच सभा आणि भाषणे झाल्यामुळे आंदोलक मागण्या मान्य झाल्याशिवाय हटणार नाही या भूमिकेवर ठाम होते. 

सलग दुसऱ्या दिवशी औरंगाबाद-पुणे महामार्ग रोखून धरल्यामुळे या मार्गावरील वाहतूक पुर्णपणे बंद झाली होती. त्यामुळे हा मार्ग मोकळा करण्यासाठी पोलीसांनी आंदोलकांना हुसकावण्याचा प्रयत्न केला. पण त्यामुळे अधिकच चवताळलेल्या आंदोलकांनी अग्निशामक दलाची गाडी आधी पलटी केली आणि नंतर पेटवून दिली. त्यामुळे आंदोलकांनी राजकारणी आणि पोलीसांना आपले लक्ष्य केल्याचे दिसून आले. 

वारकऱ्यांची पायपीट, पुण्याकडे जाण्यासाठी वळसा
सोमवारी आषाढी एकादशी झाल्यानंतर राज्यभरातून पंढरपूरात दाखल झालेले वारकरी पुन्हा आपापल्या गावाकडे परतत आहे. मराठा क्रांती मोर्चाने त्यामुळे एसटी बसला लक्ष्य करू नका असे आवाहन आंदोलकांना केले होते. नेवासा, नगर, नाशिक व आसपासच्या भागातील वारकऱ्यांना कायगांव येथील आंदोलनाचा फटका बसला. या मार्गावरील वाहतूक बंद असल्यामुळे वारकऱ्यांना पुलावरून पायी चालत जावे लागले. औरंगाबाद-पुणे महामार्ग चोवीस तासाहून अधिका काळापासून बंद असल्याने दोन्हीकडची वाहतूक पैठण-शेगांव मार्गे वळवण्यात आली आहे. 

सरकारनामा अॅप डाऊनलोक करण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

फोटो फीचर

संबंधित लेख