MLA Udaysinh Rajput Visiting Farms
MLA Udaysinh Rajput Visiting Farms

सत्कार सोहळेनंतर...आधी शेतकऱ्यांना दिलासा महत्वाचा- उदयसिंग राजूपत

''निवडणुकीत मिळालेला विजय निश्‍चितच मोठा आहे. त्याचा आनंदही आहे, पण निसर्गाने शेतकऱ्यांना दिलेले दुःख त्यापेक्षा मोठे आहे. पावसाने शेतात काढून ठेवलेल्या पिकांना कोंब फुटले आहे, सगळीकडे पाणीच पाणी साचले आहे, अशावेळी त्यांच्या नुकसानीचे पंचनामे करून त्यांना सरकारकडून मदत मिळवून देणे गरजेचे आहे. त्यामुळे सत्कार-सोहळेनंतर आधी शेतकऱ्यांना दिलासा देणे महत्वाचे आहे,'' असे म्हणत कन्नडचे नवनिर्वाचित शिवसेना आमदार उदयसिंग राजपूत यांनी थेट शेतात धाव घेत पिकांच्या नुकसानीची पाहणी सुरू केली आहे.

औरंगाबाद : ''निवडणुकीत मिळालेला विजय निश्‍चितच मोठा आहे. त्याचा आनंदही आहे, पण निसर्गाने शेतकऱ्यांना दिलेले दुःख त्यापेक्षा मोठे आहे. पावसाने शेतात काढून ठेवलेल्या पिकांना कोंब फुटले आहे, सगळीकडे पाणीच पाणी साचले आहे, अशावेळी त्यांच्या नुकसानीचे पंचनामे करून त्यांना सरकारकडून मदत मिळवून देणे गरजेचे आहे. त्यामुळे सत्कार-सोहळेनंतर आधी शेतकऱ्यांना दिलासा देणे महत्वाचे आहे,'' असे म्हणत कन्नडचे नवनिर्वाचित शिवसेना आमदार उदयसिंग राजपूत यांनी थेट शेतात धाव घेत पिकांच्या नुकसानीची पाहणी सुरू केली आहे.

मतमोजणी आणि निकाला जाहीर होऊन दोन दिवस उलटले आहे, पण निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींनी विजयोत्सव साजरा करण्याऐवजी आपापल्या मतदारसंघात पावसामुळे नुकसान झालेल्या शेतीचे पंचनामे करण्याला प्राधान्य दिले आहे. जिल्ह्यात सर्वत्र पावसाने धुमाकूळ घातला. त्यामुळे नद्या, नाले ओसंडून वाहत आहेत, तर अनेक शेतांमध्ये पाणी साचले आहे. कापणी करून ठेवले शेतातील पीक पाण्यामुळे सडले आहे, किंवा त्याला कोंब फुटले आहेत.

कन्नड-सोयगांव मतदारसंघात मका आणि कापसाच्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसना झाल्यामुळे आमदार उदयसिंग राजपूत यांनी सत्कार, सोहळे न करता शेतकऱ्यांच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्यासाठी प्रशासनाकडे पाठपुरावा सुरू केला आहे. तहसिलदारांना सूचना दिल्यानंतर आज त्यांनी कृषी विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना सोबत घेत थेट शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन झालेल्या नुकसानीची पाहणी केली.

याबाबत उदयसिंग राजपूत म्हणाले, ''निवडणुक झाली, निकाल जाहीर झाला, कुणी तरी जिंकला, कुणी हारला हे सुरूच राहणार आहे. पण निसर्गाच्या लहरीपणामुळे बळीराजाचे झालेले नुकसान भरून येणार नाही. मतदारसंघात अनेक ठिकाणी पुराची परिस्थिती आहे. शेतात गुढघाभर पाणी साचलेले आहे, मक्‍याच्या कापून ठेवलेल्या कणसांना अक्षरश कोंब फुटले आहे, कापसाचे बोंड सडून गेले आहे. डोळ्याने दिसणाऱ्या नुकसानीपेक्षा प्रत्यक्ष नुकसान त्याहून अधिक आहे, याचा अंदाज शेतकऱ्यांना भेटल्यावर आणि त्यांच्या शेतात जाऊन पाहिल्यावर लक्षात येते.''

''आमदार झाल्याचा आनंद निश्‍चित आहे, पण शेवटी लोकप्रतिनिधी म्हणून लोकांनी आम्हाला कशासाठी निवडूण दिले याचे भान असणे देखील महत्वाचे आहे. तहसिलदार व संबंधित प्रशासकीय यंत्रणेला शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसांनीचे तातडीने पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या आहेत, या शिवाय कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना घेऊन मी स्वतः गावागावांमध्ये जाऊन पिकांची पाहणी करत आहे. लवकरच पंचनामे होऊन शेतकऱ्यांना सरकारी मदत कशी मिळेल यासाठी आपला प्रयत्न राहील,''असेही राजपूत 'सरकारनामा'शी बोलताना म्हणाले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com