लवकरच 'त्यांचे' खासदार शंभरावर येतील : जयंत पाटील

येत्या चार महिन्यांत पेट्रोलचा दर 100 वर गेल्याशिवाय राज्यकर्त्यांना झोप लागणार नाही. लवकरच त्यांचे खासदार शंभरावर येतील, अशी खोचक टीका आमदार जयंत पाटील यांनी सरकारवर केली.
लवकरच 'त्यांचे' खासदार शंभरावर येतील : जयंत पाटील

औरंगाबाद : येत्या चार महिन्यांत पेट्रोलचा दर 100 वर गेल्याशिवाय राज्यकर्त्यांना झोप लागणार नाही. लवकरच त्यांचे खासदार शंभरावर येतील, अशी खोचक टीका आमदार जयंत पाटील यांनी सरकारवर केली. राज्यकर्त्यांचा आत्मविश्वास कमी झाल्यामुळे धर्मा-धर्मात तेढ वाढवणारे मुद्दे समोर येऊ लागले आहेत, असेही ते म्हणाले.

मराठवाडा साहित्य परिषदेच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष मधुकरराव मुळे यांना परिषदेतर्फे जीवन गौरव पुरस्काराने गौरविण्यात आले. यशवंतराव चव्हाण सभागृहात मंगळवारी (ता. 25) सायंकाळी झालेल्या या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, आमदार माजी मंत्री जयंत पाटील, अंबडचे आमदार राजेश टोपे, बदामराव पंडित, ज्येष्ठ साहित्यिक फ. मुं. शिंदे, विजयकुमार कोलते, ऍड. सुखदेव शेळके व्यासपीठावर उपस्थित होते. 

जयंत पाटील यांनी आपल्या भाषणात आज पुन्हा निधर्मी विचारांची गरज व्यक्त केली. ते म्हणाले, "कलबुर्गी, पानसरे, डॉ. दाभोलकर, गौरी लंकेश यांचे मारेकरी औरंगाबाद, जालना जिल्ह्यात सापडले. तरुण पोरांनी गोळ्या घातल्याचे कबूल केले. इतक्या तरुण वयात या प्रवृत्ती कशा आल्या? आपल्याला कुणीतरी सोडवेल, याची खात्री असते म्हणून तरुण या मार्गाला जातात."

तर आरक्षणाची गरजच राहणार नाही
खासगी क्षेत्र वाढत नाही, असे लक्षात आल्यामुळे लोक सरकारी नोकरीकडे पाहू लागले. म्हणूनच वेगवेगळे समाज आरक्षण मागू लागले. तरुणांच्या हाताला काम मिळत राहिले,  तर आरक्षणाची मागणी करायची गरज राहणार नाही, असे श्री. पाटील म्हणाले.

जिथे शांतता आहे, तिथे गुंतवणूक येते. प्रश्न सुटू शकतात. फक्त प्रामाणिक इच्छा हवी. साहित्य परिषदेच्या व्यासपीठावरुन यावर मार्गदर्शन झाले पाहिजे. मराठवाड्याने महाराष्ट्राला दिशा दिली आहे.  आता पुन्हा तसे व्हावे, अशी अपेक्षा त्यानी व्यक्त केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com