जैस्वाल भेटल्यावर इम्तियाज जलील यांनी घेतली फिरकी..म्हणाले मी करणार धनुष्यबाणाला मतदान!

विधानसभा निवडणुकांसाठी मतदानाला आलेले एमआयएमची प्रदेशाध्यक्ष तथा खासदार इम्तियाज जलील यांची व मध्य मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार प्रदीप जैस्वाल समोरासमोर आले. त्यावेळी जयस्वाल यांच्या सोबत आलेल्या नगरसेवक मोहन मेघावाले मतदानासाठी रांगेत असलेल्या खासदार इम्तियाज जलील यांच्या पत्नीला हात जोडून म्हणाले, ताई धनुष्यबाण लक्षात ठेवा. यावर मिस्कीलपणे हसत इम्तियाज जलील म्हणाले मी करणार धनुष्यबाण याला मतदान.....असे म्हटल्यानंतर जयस्वाल आणि इम्तियाज जलील दोघेही मनमोकळेपणानं हसले.
Pradip Jaiswal and Imtiaz Jalil on Aurangabad Voting Centre
Pradip Jaiswal and Imtiaz Jalil on Aurangabad Voting Centre

औरंगाबाद : विधानसभा निवडणुकांसाठी मतदानाला आलेले एमआयएमची प्रदेशाध्यक्ष तथा खासदार इम्तियाज जलील यांची व मध्य मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार प्रदीप जैस्वाल समोरासमोर आले. त्यावेळी जयस्वाल यांच्या सोबत आलेल्या नगरसेवक मोहन मेघावाले मतदानासाठी रांगेत असलेल्या खासदार इम्तियाज जलील यांच्या पत्नीला हात जोडून म्हणाले, ताई धनुष्यबाण लक्षात ठेवा. यावर मिस्कीलपणे हसत इम्तियाज जलील म्हणाले मी  करणार धनुष्यबाण याला मतदान.....असे म्हटल्यानंतर जयस्वाल आणि इम्तियाज जलील दोघेही मनमोकळेपणानं हसले.

इम्तियाज जलील आपल्या सह परिवारासह मतदानाचा हक्क बजावणार बजावण्यासाठी हाडको येथील गोदावरी पब्लिक स्कूल मध्ये आले होते त्यावेळी गेली आणि रांगेत उभे राहून मतदानाचा हक्क बजावला. दरम्यान रांगेत उभे असताना मध्य मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार प्रदीप जयस्वाल हे सेंटरची पाहणी करण्यासाठी आले असता त्यांनी जलील यांचा हातात हात घेतला.  त्यांच्या सोबत नगरसेवक मोहन मेघावली व इतर कार्यकर्ते होते. मेगावाले यांनी जाताना इम्तियाज जलील यांच्या पत्नी यांना हात जोडून राहिले ताई लक्षात ठेवा धनुष्यबाण असे म्हटल्यानंतर तत्परता दाखवत इम्तियाज जलील यांनी मेगावाल्यांना तात्काळ उत्तर दिले. मी करणार धनुष्यबाण याला मतदान, असे म्हटल्यानंतर जयस्वाल आणि तसेच उपस्थितांमध्ये हशा पिकला. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com